shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गर्भपात केला नाही म्हणून पत्नीचा केला पतीने खून पतीस जन्मठेप नगर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक ०४ ऑगस्ट २०२२

गर्भपात केला नाही म्हणून पत्नीचा केला पतीने खून पतीस जन्मठेप नगर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना..!!
 
संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे सदरील घटना २०१६ रोजी घडली होती.दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यानंतर गर्भपात केला नाही या कारणावरून पत्नीच्या तोंडावर उशिने दाबून तिच्या हाताच्या तर्जनीला इलेक्ट्रिक वायर बाधून शॉक देत तिचा खून केल्याप्रकरणी पतीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे तर सासू आणि दिराची पुराव्या अभावी मुक्तता करण्यात आली.बाळासाहेब भिकाजी पिलगर वय ३२ वर्ष असे पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.२७ वर्षीय वर्षा बाळासाहेब पिलगर ही विवाहिता दुसऱ्यांदा गरोदर राहिली याची माहिती समजल्याने नवरा बाळासाहेब,दिर सुरेश,सासू लिलाबाई यांनी तिने गर्भपात करावा असे सांगितले तिने ते ऐकले नाही,याचा राग मनात धरून आरोपींनी तिच्या नाका तोंडावर ऊशीने दाबत तसेच तिच्या हाताच्या तर्जनीला इलेक्ट्रिक वायर बांधून तिला शॉक जीवे ठार मारले.

अशा आशयाची तक्रार वर्षा हिच्या वडिलांनी आरडी पोलीसात दाखल केली होती.३० जुलै २०१६ रोजी ही घटना घडली होती तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश कामाले,पोह/तात्याराव वाघमारे यांनी या खून प्रकरणाचा तपास करून संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले होते,जिल्हा न्यायाधीश वाय.पी.मनाठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती.या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी काम बघितले.आरोपीच्या आणि सरकार पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीश मनाठकर यांनी आरोपी नवरा बाळासाहेब पिलगर याला पत्नीच्या खून प्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय त्याला आणखी वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या खून प्रकरणातील अन्य आरोपी विरोधात पुरेसे पुरावे न्यायालयासमोर न आल्याने त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

या खटल्यात सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांना सहाय्यक फौजदार सुनील सरोदे,पोलीस कर्मचारी सारिका डोंगरे,प्रवीण डावरे,चंद्रकांत तोरवेकर,दिपाली दवगे,स्वाती नाईकवाडी, एकनाथ खाडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. 
 
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close