माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरातील शहा कुटुंबीयांचे केले सांत्वन.
इंदापूर प्रतिनिधी: माजी राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरातील प्रसिद्ध शहा ब्रदर्स चे व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंदशेठ शहा यांच्या मातोश्री व गोकुळदासशेठ शहा यांच्या पत्नी शकुंतला (भाभी )शहा यांचे काल(दि.३)रोजी निधन झाले.
इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी (दि.४)शहा कुटुंबियांची इंदापूर येथील निवासस्थानी जाऊन शहा कुटुंबाचे सांत्वन केले.
यावेळी इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे,इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे,नगरसेवक पोपट शिंदे,अमर गाडे,दिलीप वाघमारे,सागर पवार,प्रमोद राऊत,सचिन देवकर आदी उपस्थित होते

