महसूल सहाय्यक मनोज आप्पासाहेब आनंतकर यांना तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव.
इंदापूर प्रतिनिधी:भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन समारंभ शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी इंदापूरचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी श्रीकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण नवीन प्रशासकीय इमारत इंदापूर येथील कार्यालयाच्या आवारात संपन्न. यानंतर भारतीय स्वातंत्र्य ंचा ७५ वे वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित क्षेत्रामध्ये निष्कृह वृत्तीने काम करून शासनाची जनसामान्यातील प्रतिमा उंचवणाऱ्या इंदापूर तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवचे औचित्य साधून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये मनोज आप्पासाहेब आनंतकर महसूल सहाय्यक यांना तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, महसूल नायब तहसीलदार क्षितिजा वाघमारे, संजय गांधी योजना नायब तहसीलदार प्रियंका वेंकर तसेच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुजावर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर सर्व महसूल कर्मचारी वृंद व इतर मान्यवर उपस्थित होते.

