shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बांडेवाडी शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम.*


*बांडेवाडी शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम.*

*शाळेच्यावतीने युवा धावपटू रचना बांडे व कबड्डी खेळाडू रोहित बांडे मार्गदर्शक शिक्षक सागर बनसुडे यांचा सत्कार.*
इंदापूर प्रतिनिधी:दि १५ वार्ताहर इंदापूर. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांडेवाडी येथे विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. *प्रभात फेरी , ध्वजारोहण , राष्ट्रगीत , ध्वजगीत ,  कवायत , योगासने , विद्यार्थी भाषणे , सांस्कृतिक कार्यक्रम , खेळाडू सत्कार , खाऊ वाटप* असे विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले.
                    *शाळचे माजी विद्यार्थी युवा खेळाडू , उत्कृष्ट कबड्डीपटू रोहित बांडे . पुणे जिल्हा अॅथलेटिक्स स्पर्धा ट्रायथान मध्ये द्वितीय क्रमांक मिळवून राज्य स्पर्धेत पात्र ठरलेली रचना बांडे व एस बी स्पोर्ट्सचे क्रीडा शिक्षक सागर बनसुडे यांचा फेटा , पुष्पहार , श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.*
                        मुलांची भाषणे , कसरती ,  विविध देशभक्तीपर गाण्यावर केलेली सुंदर नृत्य उपस्थिती दाद दिली. कौतुक केले. जनार्धन गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.

                  यावेळी माजी सरपंच तथा सदस्य भालचंद्र बांडे , शाळा समिती अध्यक्ष दिपक बांडे , रामदास बांडे , बापुसो राहिगुडे , सतिष बांडे , पांडुरंग वागजकर , सुहास बांडे , सचिन बांडे , रविंद्र बांडे , भाऊसाहेब कदम , दयाराम भोई , स्वराज मित्र मंडळ युवक , महिला , जेष्ठ नागरिक , विद्यार्थी , पालक , अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले , ललिता वाघमोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व संयोजन मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी केले.

close