शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक ०४ ऑगस्ट २०२२
पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे धक्कादायक प्रकार उघडकीस..!!
तालूक्यात प्रथमच सुमारे दिड ते दोन कोटी रुपयांचा ड्रग्ज सारखा आमली पदार्थांचा मोठा साठा जप्त झाल्यानें याबाबत सर्वत्र चर्चेला उधाण ..!!
संपूर्ण नगर जिल्ह्यात हा माल पार्सल होत असल्याची ही चर्चा..!!
राहुरी : राहुरी पोलिसांनी शहरात छापा टाकत अंमली पदार्थांसह प्रतिबंध केलेले नशा आणणारे औषधे, गर्भ नष्ट करणारे औषधे आणि उत्तेजित करणाऱ्या ड्रग्ससदृष्य पदार्थांसह कोट्यवधी रूपयांचा साठा जप्त करण्यात आला. राहुरी ते बारागाव नांदूर रस्त्यावरील शिव चिदंबरम मंगल कार्यालयालगत असलेल्या गाळ्यांमध्ये प्रतिबंधित औषधांचा मोठा साठा लपविण्यात आला होता. छुप्या मार्गाने या औषधांची विक्री करणारे पोलिसांच्या रडारवर आले असून अनेक छोटे मोठे गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून मिळत आहे.
राहुरी पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त खबर्याकडून प्रतिबंधित औषधांसह नशेचे अंमली पदार्थ विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक दराडे यांनी पो.स.ई. सज्जन नर्हेडा, महिला पो.स.ई. ज्योती डोके, पोलिस हवालदार अजिनाथ पाखरे, अशोक शिंदे, विकास साळवे, नदीम शेख, प्रविण अहिरे, दादासाहेब रोहोकले, नितीन शिरसाठ, राजेंद्र आरोळे यांनी सापळा लावून तीन जणांना ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच ताब्यात घेतले.
राहुरी शहरातील बारागाव नांदुर रोड लगत गोडाऊन मध्ये सापडल्या नशेच्या,झोपेच्या,गर्भपाताच्या,उत्तेजित करणार्या गोळ्या आणि कोर्याक्स, लिक्वीड, ड्रग्स जप्त..!!
पोलिसांनी खाक्या दाखविताच ड्रग्ससदृष्य साठ्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर रस्त्यावर असलेल्या शिव चिदंबरम मंगल कार्यालय लगत असलेल्या एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये छापेमारी केली. गोडाऊनमध्ये गर्भ नष्ट करणाऱ्या औषधांसह उत्तेजनाचे पदार्थ, गुंगीचे औषधे आणि नशा आणणारे विविध औषधांचा मोठा साठा दिसून आला. जवळपास एक कोटीपेक्षा जास्त रूपयांचा साठा सापडल्याची माहिती पसरताच नांदूर रत्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे पोलिस निरीक्षक डी.एम. दरंदले यांना पाचारण केले. श्रीरामपूर विभागाचे पोलिस उप अधिक्षक संदिप मिटके यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देत तपासाला गती दिली.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

