शिरसाटवाडी येथे घरोघरी तिरंगा अभियान व आजादी का अमृत महोत्सव राबवणे बाबत जनजागृती व लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी ग्रामपंचायत कडून नियोजन.
इंदापूर प्रतिनिधी: ग्रामपंचायत शिरसाटवाडी यांच्यावतीने दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मासिक बैठक व ग्रामसभा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या अभियान राबवण्याबाबत व आजादी का अमृत महोत्सव राबवणे बाबत जनजागृती व लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी ग्रामपंचायत कडून नियोजन करण्यात आले. त्यामुळे सरपंच जयकुमार रावण आणि ग्रामसेवक एन. एस. चंदनशिवे यांनी मार्गदर्शन केले. हे अभियान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गावातील शिक्षण, आरोग्य, कृषी, पोस्ट, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षक आरोग्यसेवक, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, कृषी सहाय्यक, उपसरपंच, सर्व सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, वकील असे अनेक पदाधिकारी, ग्रामसेवक गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी आणि केंद्र चालक हे ही उपस्थित होते.

