shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपाच्या वतीने शनिवार दि. १३ ऑगस्ट रोजी इंदापूरमध्ये भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन .

भाजपाच्या वतीने शनिवार दि. १३ ऑगस्ट रोजी इंदापूरमध्ये भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन .
   इंदापूर प्रतिनिधी:भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्ष दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुका भाजपाच्या वतीने शनिवार दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन केले असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष  शरद जामदार यांनी दिली.
    तिरंगा बाईक रॅलीचा मार्ग- मालोजीराजे चौक, बायपास (प्रारंभ) - संविधान चौक तहसील रोड (१०० फुटी )अकलूजनाका - श्रीराम वेस - तारेची शाळा रोड - पोरापोरांची चावडी पानदरा - नेहरू चौक- मेन रोड (पेठ) - छत्रपती शिवाजी चौक (खडकपुरा ) व्यंकटेशनगर - बाबा चौक- टेंभुर्णी नाका - दर्गा मज्जिद चौक-चाळीसफुटी रोड - नगरपालिका प्रांगण (सांगता) असा असणार असून यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी केले.
close