shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमसाखर येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळास प्रारंभ.

निमसाखर येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळास प्रारंभ.
इंदापूर प्रतिनिधी: श्रावण मास सुरू झाला असून गावागावांमध्ये विविध धार्मिक सांप्रदायिक कार्यक्रमाचे आयोजन होत असतात त्याचप्रमाणे निमसाखर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने निमसाखर गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दिनांक १२ ऑगस्ट २०२२ पासून १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत होणार आहे. त्याचा प्रारंभ आज सकाळी ९ वाजता झाला. यावेळी अनेक भाविक उपस्थित होते.
मौजे निमसाखर व पंचक्रोशीतील सर्व परमार्थ प्रेमी व भाविक भक्तांसाठी गेली सतरा वर्षापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर निमसाखर येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चे आयोजन समस्त ग्रामस्थ निमसाखर यांच्या वतीने दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असून त्याचा प्रारंभ कलश पूजन व विना पूजन सकाळी नऊ वाजता करून झाला आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचे व्यासपीठ चालक ह.भ. प. शिरसाट महाराज शिरसाटवाडी, मनीषा चव्हाण तसेच गायनाचार्य घोगरे महाराज शिंदेवाडी, मृदुंगाचार्य कृष्णा लक्ष्मण फडतरे बोराटवाडी. या सप्ताह मध्ये कीर्तन साथ समस्त निमसाखर भजनी मंडळ, बोंद्रे वस्ती, जाधव मळा, कारंडे वस्ती, बांगार्डे भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ निमसाखर यांचे होणार आहे . वेनेकरी सेवा: मल्हारी दरेकर, माऊली महारनवर, कुंडलिक खुडे, उत्तम रणवरे, सुनील सुतार, मुरलीधर रणवरे हे सेवा करणार या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ ,काकडा भजन ६ते ७, हरिपाठ सकाळी ७ ते १२ तसेच दुपारी ३ ते ५ ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन, रात्री ११ ते २ हरिजागर या सप्ताह मधील कीर्तन सेवा निंबाळकर महाराज मठाचीवाडी, ज्ञानेश्वर फुले महाराज, नंदकुमार पवार महाराज,फुले महाराज, राजेंद्र मोरे महाराज, डोंबाळे महाराज कळंब, तांबे महाराज तांबेवाडी, सोमनाथ घोगरे महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. चहा नाष्टा ची सेवा भागवत सुतार, मुरलीधर होमकर ,बाळासो अडसूळ, शिवाजी रणवरे, लहू दरेकर, महादेव अडसूळ, मदन सुतार च्या वतीने होणार आहे. सकाळच्या अन्नदान पंगतीची सेवा जयसिंग पवार, भिवाजी मोरे, एकनाथ महारनवर, जयवंतराव मोरे, संजय घाडगे, उत्तम रणवरे ,हनुमंत माने, तसेच सायंकाळची अन्नदान सेवेची पंगत विलास कारंडे, कल्याण दरेकर , पोपट जाधव, लालासो चव्हाण, दीपक अडसूळ, किसन मगर ,अंकुश दरेकर, काल्याचा महाप्रसाद शिवराम धोंडीबा काटे यांच्यावतीने होणार आहे. मंडप व्यवस्था कैलास मंडप व स्पीकर्स निमसाखर यांची  आहे.
close