श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयातून 'हर घर तिरंगा'चा नारा.
इंदापूर प्रतिनिधी:
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भारतीय राष्ट्रध्वज असणारा तिरंगा झेंडा अपलोड करण्याचे विक्रमी उद्धीष्ट करण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना आणि विध्यार्थी विकास मंडळाने हाती घेतला आहे.त्याची नोंद स्वातंत्र्यदिनी गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये केली जाणार आहे.
'हर घर तिरंगा' या अभियानाची सुरवात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो अपलोड करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आली आहे.त्यानुसार बावडा येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात श्री शिवाजी एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धनजी पाटील, निरा भीमा सहकारी कारखान्याचे सदस्य उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष मनोज पाटील,सचिव व बावडा गावचे सरपंच किरण पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. लहू वावरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रकाश पांढरमिसे विध्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रवीण घोगरे व इतर प्राध्यापक यांनी तिरंगा ध्वजासह स्वतःचा फोटो घेऊन अपलोड करून " हर घर तिरंगा "या अभियानास महाविद्यालयातून प्रारंभ केला. उपस्थित मान्यवरंच्या हस्ते विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने स्वयंसेवक विध्यार्थी, सहभागी झाले होते.यावेळी महाविद्यालयाचे विध्यार्थी व श्री शिवाजी एज्यूकेशन सोसायटीचे शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विध्यार्थी यांचे तिरंगा हाती घेतलेले 621 विध्यार्थी यांचे फोटो अपलोड करण्यात आले.असून हा उपक्रम 15 ऑगस्ट पर्यंत सुरु ठेवणार आहे अशी माहिती 'रासेयो'चे इंदापूर तालुका विभागीय समन्वयक डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी माहिती दिली.
भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये मोठ्या संख्येने "माझा तिरंगा माझा अभिमान" मानून मोठ्या संख्येने या "हर घर तिरंगा" सदर उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. लहू वावरे यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना केले.

