*भिमाई आश्रमशाळेची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रॅली*.
*"हर घर तिरंगा" घर घर तिरंगा" अभियानात विद्यार्थ्यांचा सहभाग*
*इंदापूर प्रतिनिधी (दि.१२) मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त इंदापुर शहरात "हर घर तिरंगा" अभियान दि.१३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी भव्य रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीचे नेतृत्व भिमाईचे मुख्याध्यापक साहेबराव पवार,माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या प्राचार्या अनिता साळवे यांनी केले. रॅलीत विद्यार्थी व शिक्षकांनी फलक,तिरंगा ध्वज घेऊन आपला सहभाग नोंदवला. उंच धरा रे उंच धरा, तिरंगा आपला उंच धरा.. हर घर तिरंगा, घर घर तिरंगा., भारत माता की जय, वंदे मातरम ! अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.तसेच छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे ,महात्मा फुले, राजे उमाजी नाईक यांच्या नामाचा जय घोष करत भिमाई आश्रमशाळेपासून रॅलीस प्रारंभ झाला. एक वाजता सुरु झालेली प्रभात फेरी शहराच्या साठेनगर, आंबेडकरनगर, लोकमान्य नगर, बावडा वेस ,राजे उमाजी नाईक नगर, आदी भागात पोहचली. यावेळी दि.१३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ ह्या कालावधीत शहरातील नागरिकांनी घरोघरी तिरंगा ध्वज लावण्याबाबत विद्यार्थ्यांनी घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून आव्हान केले. यावेळी हलगी व घोषणांच्या निनादात इंदापूर नगरी दुमदुमली होती.

