प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : १३ / राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण ,नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर , पोलीस विभाग ,आरोग्य विभाग , महिला बालविकास विभाग आणि स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यामाने वारांगणांना त्यांच्या कायदेशीर हक्काबाबत शिक्षित करण्याच्या उद्देशाने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम दि . ८ ऑगस्ट रोजी भरोसा सेल हॉल येथे साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भाग्यश्री का. पाटील यांनी केली.त्यांनी आपल्या प्रस्तावनेत समाजाचा वारंगणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे व त्यांना सन्मानाने जगता आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर श्री. सुधाकर व्ही.यार्लगड्डा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एक कथा सांगितली. त्यामध्ये त्यांनी एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषासोबत मोकळेपणाने गप्पा केल्या किंवा हास्यविनोद केला म्हणजे त्या स्त्रीचे चारित्र्य योग्य नाही, हे समजणे अतिशय चुकीचे आहे ,असे सांगितले त्यासाठी पुरुषांनी स्त्री कडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास डॉ . इंगळे यांनी उपस्थित वारांगणा यांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. स्नेहालयाचे श्याम आसवा यांनी वारंगणांना समाजात वावरताना कोणत्या गोष्टींची अडचण येते व त्यांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये वारंगणांनी कशा रीतीने समाजातील लोकांना मदत केली याबाबत सांगितले तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी वारांगणांना कायदेशीर परवाना मिळावा की नाही याबाबत अजूनही संदेश आहे असे मत व्यक्त केले .
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य अँड. श्री सुनील मुंदडा यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. ए. ए. आळकुटे यांनी केले .सदर कार्यक्रमास श्री.सुनील घोगरे ,जिल्हा शल्य चिकित्सक, श्री एम ए पाटील ,जिल्हा परिविक्षा अधिकारी ,श्री बी.बी.नांदुरकर ,पोलीस उपनिरीक्षक डॉ. इंगळे, स्त्री रोग, तज्ञ ,जिल्हा रुग्णालय, श्री. बी. ए. देशमुख ,पोलीस उपनिरीक्षक, अँड. श्री. श्याम असावा, स्नेहालय, अँड. स्वाती नगरकर तसेच प्रवीण मुत्याल स्नेहालय ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी तसेच वकील मंडळी उपस्थीत होते.

