प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर :१३ / साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्था अंतर्गत आडसूळ टेक्निकल कॅम्पस चास येथे ‘ हर घर तिरंगा ‘ अभियानाचे आयोजन करण्यात आले . आदरणीय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार देशभर व हर घर तिरंगा फडकविण्याचा उत्साह सर्वच भारतीय नागरिकांत दिसून येत आहे.
भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष होत आहेत. म्हणजेच अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिवस . या दिवसाचे प्रत्येक लहान थोर साक्षीदार असणार आहेत.भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक शिलेदाराची आठवण व राष्ट्रभक्ती जोपासणे हाच मानस समोर ठेऊन देशभर अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे.
अमृत महोत्सव म्हणजे एक राष्ट्रीय उत्सव .हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरी तिरंगा फडकवून साजरा करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. अनिरुद्धजी आडसूळ , उपाध्यक्ष मा. विश्वनाथजी आडसूळ, टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य डॉ. प्रदीप एम पाटील , उप प्राचार्य प्रा. किशोर जाधव, पॉलीटेक्निक चे प्राचार्य रमेश गडाख आणि एम बी. ए विभाग प्रमुख प्रा. सुहास पाखरे यांनी केले.
या अभियाना अंतर्गत सेवानिवृत्त सुभेदार मा. चांगदेव बाबासाहेब कापसे (रहिवासी देहरे) यांनी विद्यार्थ्यांना देशभक्तीपर धडे दिले. त्यानंतर चास गावचे सरपंच मा. राजेंद्र गावखरे व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशी रॅली काढून गावामध्ये ‘ हर घर तिरंगा’ अभियानाची माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे चे सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक , शिक्षकेत्तर वृंद सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी , ग्रामस्थ उत्सफुर्तपणे सहभागी झाले. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. अभिषेक जवरे ,प्रा. रमेश काकडे तसेच सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

