प्रतिनिधी : स्वामीनाथ हरवाळकर
अक्कलकोट : दि .१३ / देशात सर्वांना स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि न्याय मिळवून देण्याचे काम संविधानाने केले असल्याचे प्रतिपादन लिंगायत धर्मगुरू पूज्य बसवलिंग महास्वामीजी यांनी केली.
हर घर तिरंगा,घर घर संविधान या अभियानाचा शुभारंभ ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी सुशीला राचप्पा ठमके यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकाच्या वाचनाने झाली.अध्यक्षस्थानी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी हे होते पुढे बोलताना पूज्य बसवलिंग महास्वामीजी म्हणाले देश यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे.देशात अनेक भाषा जात,पंत,धर्म आहेत ते सर्व विसरून बलशाली राष्ट्र उभारणीसाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.
विश्वगुरू महात्मा बसवेश्वर साहित्य परिषद महाराष्ट्र आणि युवा भारत निर्माण अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजक स्वामीनाथ हरवाळकर यांनी या शानदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी दोनशेहून अधिक राष्ट्रध्वजाचे मोफत वाटप करून प्रत्येक घरोघरी महाविद्यालयीन शंभर विद्यार्थी जाऊन संविधानाची माहिती देणार असल्याचे हरवाळकर यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .शिवराय आडवीतोट यांनी राष्ट्रध्वजाची निगा राखून त्याचे संरक्षण करण्याचे आवाहन केले यावेळी प्रा.डॉ. भैरप्पा कोणदे, प्रा.गुरुसिद्धया स्वामी प्रा.विलास अंधारे, नीलकंठ धनशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ . गणपतराव कलशेट्टी यांनी केले .

