अकोले । प्रतिनिधी :-
प.पु. सुभाषपूरी महाराज यांचे वास्तव्याने पुनीत झालेले व अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तिरावरती वसलेल्या अकोले तालुक्यातील कळस येथील भवानी माता मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहन सोहळा संपन्न झाला.
पंचदशनाम जुना आखाडा हरिद्वार चे थानापती अमृतपुरी महाराज, त्रंबकेश्वर चे सेक्रेटरी अभयपुरी महाराज, योगी केशव बाबा चौधरी, ट्रस्ट चे अध्यक्ष विठ्ठल वाकचौरे यांचे शुभहस्ते भवानी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच कलशारोहण करण्यात आले.
हभप साध्वी सोनालीताई करपे यांनी " उभारिला हात, जगी जाणवली मात, देव बैसले सिंहासनी " या तुकाराम महाराज यांचे अभंगावर निरूपण केले. आपल्या कीर्तनात आदिमाया भवानी मातेचे महत्व विषद करताना अनेक पौराणिक दाखले दिले. संत अवतार हे एकटे घेतात पण जगाचा उद्धार करतात. सुभाषपूरी महाराज यांच्या अवताराणे हा परिसर पावन झाला असून तुमचा उद्धार झाला आहे. शिवाय आपणास त्याचे सानिध्य लाभले हे परम भाग्य आहे. यावेळी संत मीराबाई यांचे चरित्र आपले रसाळ वाणीने वर्णन करताना " नाचू कीर्तनाचे रंगी " सर्व भाविक भक्त तल्लीन होऊन नाचू लागले.
अकोलेचे आमदार डॉ किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी भेट देऊन दर्शन घेतले.कार्यक्रमाचे नियोजन कळसेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले. किसन भुसारी यांनी यजमान पद भूषवले तर पौरोहित्य धनुगुरु धर्माधिकारी यांनी केले. डी. टि. वाकचौरे, ट्रस्ट चे उपाध्यक्ष विष्णू वाकचौरे, सचिव गोपीनाथ ढगे, विश्वस्त सिताराम वाकचौरे, सुनील ढगे, भाऊसाहेब वाकचौरे, प्रकाश आल्हाट, नवनाथ चौधरी, प्रदीप वाकचौरे यांनी केले. तर कीर्तनात हभप गणेश महाराज वाकचौरे, अरुण महाराज शिर्के, नितीन महाराज गोडसे, प्रवीण महाराज पांडे, सूर्यकांत ढगे यांनी संगीत साथ दिली.

