shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रान डुक्कराचा हल्ला ; शालीक गेडेकर जखमी || जखमीला केले उपचारार्थ रुग्णालयात दाखल || चेक बेरडी येथील घटना..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -किरण घाटे.                                           मंगळवार  दिनांक ०९ ऑगस्ट २०२२

रान डुक्कराचा हल्ला ; शालीक गेडेकर जखमी || जखमीला केले उपचारार्थ रुग्णालयात दाखल || चेक बेरडी येथील घटना..!!
चंद्रपूर- प्रतिनिधी : चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील चेक बेरडी येथील शालीक वारलू गेडेकर या ४५ वर्षिय इसमावर रान डुक्कराने शेतात हल्ला चढवून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना आज सोमवार दि.८ ऑगस्टला दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडल्याचे वृत्त आहे.
दरम्यान जखमी शालीकला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यावर गोंडपिंपरी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर मंडळी उपचार करीत आहे.
घटनेची माहिती होताच वन विभागाच्या महिला वनरक्षक राणी पांढरे यांनी लगेच रुग्णालयात जावून जखमीची भेट घेतली व त्याचे प्रकृतीची चौकशी केली असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव नरेश कोसरे यांनी आज संध्याकाळी या प्रतिनिधीस भ्रमनध्वनीवरून सांगितले.
       अलीकडे चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा संचार अधिक वाढल्याने व अश्या घटना सतत घडत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी रूग्णालयात जावून जखमी शालीकचे बयान नोंदविले असल्याचे समजते.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @किरण घाटे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी📲+91 92844 99128
close