shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विदयार्थ्यांनी दीर्घ सुटीचा काळ कसा घालवावा ?..!!

शिक्षक- श्री. अनिल नामदेव कल्हापुरे.
शाळा पिंप्री अवघड ता. राहुरी
जिल्हा अहमदनगर.

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक ११ मार्च २०२१

विदयार्थ्यांनी दीर्घ सुटीचा काळ कसा घालवावा ?..!!

शैक्षणिक सत्र संपले की परीक्षा झालेली असते, वर्षभर शाळा कॉलेजचा अभ्यास व विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन मानसिकरित्या विद्यार्थ्यांना थकवा येतो. त्यांचा थकवा नाहिसा व्हावा, नवीन वर्गात नव्या दमाने, उमेदीने त्याठिकाणी दाखल व्हावे. या उद्देशाने सुट्ट्यांची योजना करण्यात आलेली असते. पण तो थकवा घालविताना टी. व्ही समोर तासनतास बसणे, रात्रभर जागरण, आणि सकाळी सूर्य डोक्यावर आल्यावर झोपेतून उठायचे अशा प्रकारे दिशाहीन पद्‌धतीने सुटी घालविणे योग्य ठरणार नाही अशा प्रकारचा आनंददेखील चार. आठदिवसापेक्षा अधिक तग धरणार नाही.
रिलॅक्सेशनमध्ये ही एक प्रकारची क्रिएटिव्हिटी आवश्यक आहे. कारण प्रत्येक दीर्घकालीन सुटी ही जशी अभ्यासाचा शीण घालविण्यासाठी आहे. तशीच ती करियरचा आकार देण्यासाठी आहे. वि‌द्यार्थाचे व्यक्तिमत्व फुलावे असे काही विधायक कार्य सुट्यांमध्ये झालेच तर मजा! सुटयामध्ये असे काही व्हावे की जे अन्य वेळी करणे शक्य नाही. उन्हाळ्‌याच्या सुटीमध्ये आपण काहीतरी नवीन शिकावं, सुटीचा सदुपयोग करून घ्यावा असे विद्यार्थाना वाटल्याशिवाय राहणार नाही.या वयात विद्यार्थी नकळत एखादया कलेचा, छंदाचा उपासक बनतो. आकाशात उंच भरारी घेणारा पतंगआपण स्वतः तयार करावा व तो स्वतः आकाशात उंच उडवून त्याचा मनकमुराद आनंद लुटावा असे त्याला वाटणे स्वाभाविक आहे. 
        चित्र रेखाटणे, गाणे गुणगुणणे, थर्मोकोलचा आकाशदिवा करणे, बाहुल्या बनविणे, खादयपदार्थ तयार करणे अशा गोष्टीतून तो नवनिर्मितीचा आनंद मिळवत असतो याकरिता चित्रकला हस्तव्यवसाय,पोहणे, पेंटिंग, संभाषण, कला, योगासने, काचेच्या वस्तु तयार करणे, एम्ब्रोयडींग, ज्युडो, यासारखे कितीतरी वर्ग उन्हाळी सुटीमध्ये सुरु असतात यामध्ये विद्यार्थी सहभागी झाल्यास त्याच्या कलागुणांची तर जोपासना होतेच त्याचबरोबर त्याचा आत्मविश्वास देखील वाढतो.

श्री. कल्हापुरे अनिल नामदेव
MA,DED,BED,SET
जि.प.प्रा.शाळा पिंप्री अवघड ,ता- राहुरी,जि- अ.नगर 


Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close