shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पतंजलि योग समितीकडून राखीपौर्णिमा साजरी.

पतंजलि योग समितीकडून राखीपौर्णिमा साजरी.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर नगरपालिका शेजारील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व २ या ठिकाणी सुरू असलेल्या पतंजलि योगसमितीच्या मोफत स्थायी योग वर्गामध्ये रक्षाबंधनाचा सण अतिशय उत्सहात व खेळीमेळीमध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी महिला योगसाधकांनी पुरुष योगसाधकांच्या हातामध्ये बहीण भावाचे प्रतिक असणाऱ्या राखीचा रेशीम धागा बांधुन,औक्षण करून व तोंड गोड करून अतिशय पारंपारीक पदधतिने हा सण साजरा करण्यात आला.तसेच यावेळी प्रत्येक बहीणीला भावाने भेट म्हणून पितळी समई देण्यात आल्या.या कार्यक्रमास योगशिक्षीका सायरा आत्तार यांनी सर्वांना मोहरम चा प्रसाद म्हणून खाण्यासाठी खास रोट आणले होते.
या कार्यक्रमासाठी पतंजलिचे सचिन पवार,रविंद्र परबत,नाना देवकर,शरद झोळ,राजेंद्र चव्हाण,आण्णा चोपडे,गोकुळ हराळे,रामेश्वर साठे,बिभिषण खबाले,बाजीराव शिंदे,देवराव मते,सुनिल देवळालीकर तसेच महिला भगीनी सायरा  आत्तार, मेघा भंडारी,जयश्री खबाले,मिनाक्षी सातारकर,संगीता शेवाळे,सौं परबत ;वाघमारे , गवळी .
इत्यादी  कार्यक्रमात सहभागी होते.
close