रस्त्यावरून चालताना घ्यावयाची काळजी..!!
लेखक/ शिक्षक - श्री.कल्हापुरे अनिल नामदेव
MA,DED, BED, SET
जि.प .प्रा शाळा पिंप्री अवघड
बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी
१.रस्त्यावर व बसस्टॉपवर खेळू नये
२. अनोळखी व्यक्तिशी बोलू नका किंवा त्यांच्याबरोबर प्रवास करू नका जर बोलायचे असेल तर अंतर ठेवून मोठयाने बोला.
३.वाहनामध्ये चढताना किंवा उतरतांना बॅग किंवा कपडे अडकणार नाहीत याची काळजी घ्या
४. स्कूल बस पुढे निघून गेल्यानंतरच रस्ता क्रॉस करा.
५. वाहनात गोंगाट करू नका किंवा भांडू नका.
६. वाहनातून शरीराचा कोणताही भाग बाहेर काढू नका .
७. वाहनाच्या आतील मार्गात चालण्यास अडथळा होईल अशी कोणतीही वस्तु / बॅग ठेवू नका.
मुलांनो रस्त्यावरून चालताना
१. थांबा, पहा आणि मगच रस्ता ओलांडा 'या मंत्राचे कृपया पालन करा. २. रस्ता ओलांडताना अचानक वाहन आल्यास गडबडून न जाता जागेवरच थांबा.
३.रस्ता ओलांडताना प्रथम उजवीकडे, नंतर डावीकडे पाहून, वाहन येत
नाही याची खात्री करून, मगच रस्ताओलांडा.
४ अधे मधे रस्ता ओलांडू नका, झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडा .
पालकांनी लहान मुलांची घ्यावयाची काळजी
१ मुलांना रस्त्यावर खेळण्यास मनाई करावी.
२ रस्त्यावरून चालताना लहान मुलीसोबत पालकांनी रहावे.
३ मुलांना रस्ता सुरक्षिततेची जाणीव करून देणे.
४. शालेय वाहतुकीसाठी सुरक्षित वाहनाचाच वापर करावा.
५. रस्ता सुरक्षा ही घरातुनच शिकवा.
६. शालेय बसचा वापर करावा.
७. पालकांनी मुलांसोबत वाहतुकीचे नियम मोडू नये वाहतुकीचे नियम पाळूनच आदर्श निर्माण करावा.
श्री कल्हापुरे अनिल नामदेव
MA,DED, BED, SET
जि.प .प्रा शाळा पिंप्री अवघड
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

