shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सूर्यनमस्कार : कामाचा उत्साह वाढतो, बुद्धी प्रगल्भ होते, भूक वाढते, शरीराची कोणतीही तक्रार राहत नाही: शिक्षक- अनिल कल्हापुरे ..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक ०२ नोव्हेंबर २०२२

सूर्यनमस्कार : कामाचा उत्साह वाढतो, बुद्धी प्रगल्भ होते, भूक वाढते, शरीराची कोणतीही तक्रार राहत नाही: शिक्षक- अनिल कल्हापुरे ..!!

लेखक/ शिक्षक श्री. कल्हापुरे अनिल नामदेव
MA,DED,BED,SET
जि.प.प्रा.शाळा पिंप्री अवघड,
ता- राहुरी,जि- अ.नगर 
सूर्यनमस्कार : हा अवघड आहे मात्र रोज सराव केला तर साधारण महिनाभरात जमू शकतो. सूर्यनमस्कारात प्राणायामास प्राधान्य आहे.
नाकाने श्वास घेणे आणि सोडणे. १.नाकाने श्वास घेणे यास पूरक म्हणतात.
२. नाकाने श्वास रोखून धरणे यास कुंभक म्हणतात.
२. श्वास नाकाने सोडणे यास 'रेचक म्हणतात:
सूर्यनमस्कार १० आकड्यात बसविला आहे.प्रथम नमस्कार स्थिती करावी यावेळी पायाचे अंगठे एकमेकांस जुळवावेत हात जोडावेत मात्र हाताचे अंगठे इतरांना जुळवू नयेत.
१. अंक उच्चारताच नाकाने जास्तीत जास्त श्वास घ्यावा.नजर समोर ठेवावी.
२. नाकाने पूर्ण श्वास सोडावा आणि हात जमिनीस टेकवावेत.हाताचा अंगठा पायाच्या करंगळीशी ठेवावा. कपाळपट्टी गुडस्यांना चिटकावी गुडघ्यात पाय वाकवू नयेत.
३. डावा पाया मागे घेणे. गुडघा जमिनीस टेकविणे हात ताठ ठेवणे मान सरळ केवून नजर ४५ अंशावर ठेवावी. त्याप्रमाणात डोके जरा मागे नेणे. नावाने श्वास घेणे.
४. उजवा पाय मागील बाजूस घेऊन डाव्या पायास चिकटविणे हातापासून साधा दीड फूट अंतरावर नजर ठेवावी डोके, पाठ, मांड्या आणि पुढचा भाग उतरंडीप्रमाणे ठेवावा. श्वास रोखून धरावा. 
4. या सोडवा. त्याने छाती कपाळपतट्टी गुडघे पायाची बोटे इतके भाग जमिनीस टेकावेत. इतर कोणतेही भाग जमिनीस टेकवू नयेत.
6. भुजंगासन करावे म्हणजे शरीराची कमान करावी नजर आकाशाकडे असावी. हाताची तळवे, पायांश बोटे इतकेच भाग अमिनीस टेकवावेत खास घ्यावा.
 ७. शरीर मागे खेचून त्रिकोणात करावेतो छातीस टेकवावी.
पायाचे अंगठे एकमेकांस जुळवावे. टाचा जमिनीस टेकवाव्यात श्वास रोखुन धरावा.
८. डावा पाया पुढे घेणे म्हणजे डावी करंगली डाव्या हाताच्या अंगठ्यावर ठेवणे. डाव्या पायाची मांडी आणि पोटरी एकमेकास चिटकविणे कमरेस बाक देऊन ४५ कोमान नजर ठेवावी. श्वास रोखून धरावा.
९. उजवा पाय डाव्या पायाशी जुळविणे. त्याच वेळी पूर्ण श्वास सोडणे कपाळपट्टी गुडघ्याला चिटकवणे. यावेळी गुडघे वाकवू नयेत.
१०. हात जोडून ताठ उभे राहावे. श्वास रोखून सोडावा .अशाप्रकारे सूर्यनमस्कार १० आकड्यात घालावेत. जलद गतीने सूर्यनमस्कार घालू नयेत.
वयाच्या ५ वर्षाच्या मुलांपासून पुढे कितीही वयापर्यंत करता येतात.
फायदे - सूर्यनमस्कार दररोज घालावा. त्यामुळे कामाचा उत्साह वाढतो. बुद्धी प्रगल्भ होते. भूक वाढते. शरीराची कोणतीही तक्रार राहत नाही.

लेखक/ शिक्षक श्री. कल्हापुरे अनिल नामदेव
MA,DED,BED,SET
जि.प.प्रा.शाळा पिंप्री अवघड,
ता- राहुरी,जि- अ.नगर 

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close