shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय वायुसेनेचे माजी सेवा निवृत्त सैनिक सुभाष जनार्दन थोरात यांचा विविध संघटनांच्या वतीने नागरी अमृत महोत्सवी सत्कार.भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारत पाकिस्तान युद्धात दोन वेळा सक्रिय योगदान.

भारतीय वायुसेनेचे माजी सेवा निवृत्त सैनिक सुभाष जनार्दन थोरात यांचा  विविध संघटनांच्या वतीने नागरी अमृत महोत्सवी सत्कार.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी  वर्षानिमित्त भारत पाकिस्तान युद्धात दोन वेळा सक्रिय योगदान.
इंदापूर- प्रतिनिधी, ता. ११ भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी  वर्षानिमित्त भारत पाकिस्तान युद्धात दोन वेळा सक्रिय योगदान दिलेले भारतीय वायुसेनेचे माजी सेवा निवृत्त सैनिक सुभाष जनार्दन थोरात यांचा इंदापूर  शहा सांस्कृतिक भवन मध्ये विविध संघटनांच्या वतीने नागरी अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला. अकलूज येथील सुप्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांच्या हस्ते सुभाष थोरात यांचा  सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत तुकाराम महाराज यांचे वंशज गुरुवर्य ह.भ. प बापूसाहेब देहुकर महाराज होते.
यावेळी डॉ. एम. के. इनामदार म्हणाले, सुभाष थोरात यांनी माजी सैनिक, होमगार्ड अधिकारी, जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक तसेच प्रयोगशील शेतकरी म्हणून कायम देश, समाजसेवा व शेतीस  सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेतल्यास देश बलवान होईल.
बापूसाहेब देहुकर महाराज म्हणाले, सुभाष थोरात यांनी कार्य करताना कायम वारकरी संप्रदायास महत्त्व दिले. त्यामुळे त्यांच्या सेवेस नैतिक अधिष्ठान मिळून त्यांचे जीवन कृतकृत्य झाले. 
यावेळी सत्कारमूर्ती सुभाष थोरात म्हणाले, दहा वर्षाच्या मिलिटरी सेवेत आपण दोन वेळा भारत पाकिस्तान युद्धात भाग घेतला. २० वर्ष होमगार्ड अधिकारी म्हणून काम केले. घरच्या शेतीतील दीड एकर क्षेत्रात तालुक्यात सर्वप्रथम ३५ पोती, १५ क्विंटल बासमती  तांदळाचे यशस्वी उत्पादन घेतले.  नागरी सत्कार केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी कामधेनू परिवाराचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण आसबे, प्रा. प्रताप पाटील यांची भाषणे झाली.
यावेळी इंदापूर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मारुती मारकड, चिंतामणी प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष वसंत कुंजीर, कामधेनू सेवा परिवाराचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण आसबे, पतंजली भारत स्वाभिमान चे अध्यक्ष दत्तात्रय अनपट,  युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सिताप, होमगार्ड चे प्रभारी अधिकारी नारायण बुणगे, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड मनोहर चौधरी यांनी सुभाष थोरात  यांचा अमृत महोत्सवी सत्कार केला.  सामाजिक योगदान देणाऱ्या उपरोक्त सर्व संघटनांच्या अध्यक्षांचा सत्कार सुभाष थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.
स्वागत गीत प्रमोद भंडारी यांनी म्हटले.  स्वागत महेश निंबाळकर, सत्यजित थोरात, रणजित थोरात यांनी केले. प्रास्ताविक जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक बाबासाहेब घाडगे यांनी तर सूत्रसंचालन संघाचे सचिव हनुमंत शिंदे यांनी
मानले. यावेळी सेवानिवृत्त मेजर कैलास गवळी, रविराज पवार, भानुदास पवार, अंकुश पाडूळे, सुभाष मोरे, रामदास कुदळे उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.
फोटो इंदापूर - माजी सैनिक सुभाष थोरात यांचा अमृत महोत्सवी सत्कार प्रसंगी डॉ. एम. के. इनामदार, बापूसाहेब देहुकर महाराज व मान्यवर.
close