श्रीरामपुर (शौकतभाई शेख) : येथील श्रीरामपुर गॅस कंपनीचे संचालक, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष, दादा वामन जोशी नवीन मराठी शाळे चे स्कूल कमिटी सदस्य गणेश देशपांडे यांची हिंद सेवा मंडळ अहमदनगर संचलित श्रीरामपूर येथील भि.रा.खटोड कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल के.जे.सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने चेअरमन विजय नगरकर यांच्या हस्ते श्री. देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.
देशपांडे यांना हिंद सेवा मंडळ अहमदनगर चे मानद सचिव मा संजय जोशी यांनी निवडीचे पत्र दिले यावेळी श्री.देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मी या विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयास सर्वतोपरी मदत करील,तथा विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि स्कुल कमेटी सदस्य, पदाधिकारी यांच्यात वेळोवेळी समन्वये साधत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी कसे अधिकाधिक शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना फायदा पोहचेल याकडे कटाक्षाने लक्ष देईल असेही ते म्हणाले.
याप्रसंगी योगेश शेटे यांनी सर्व शिक्षकांची ओळख करून दिली, महाविद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल भांगरे सर यांनी महाविद्यालयाची माहिती सांगितली,
या प्रसंगी चेअरमन संजय छल्लारे स्कूल कमिटी सदस्य मा माणिक जाधव उमेश तांबडे प्रा.शेर अली सय्यद,प्रा.अविनाश राउत,प्रा चंद्र कला जाधव, प्रा.सुवर्णा कुमावत, प्रा.दिपाली जाधव, माळी आदी मान्यवर उपस्थित होते

