1)
खुळा पोळा ..
ठरवितो दर वर्षी रे
जोरात करू पोळा
साधेपणाने उत्सव
साजरा होतो बाळा
कधी करतो सामना
तोंड देतो दुष्काळा
पिडतो कधी पुराने
अवकाळीपावसाळा
पिके हातची घालवी
या निसर्ग नानाकळा
सणनको ऋण नको
जाणी तू भाव भोळा
येता संकट कोरोना
म्हणतात गर्दी टाळा
जाहीर महोत्सवाला
सकलालावला टाळा
दिस आले सुवर्णाचे
आताकोरोना संपला
सण करावा आपला
आनंद मना व्यापला
2)
सण ..
सण येता पोळ्याचा
खुशीत सर्जा राजा
पोळा भासे दिवाळी
नुसती मजाचं मजा
आपण रे नशीबवान
असाबाप बळीराजा
प्रेम त्याचे ओथंबते
देतो सळाळती उर्जा
मिरवणुकीत नाचतो
केवढा गाजा वाजा
आपण खाई भाकर
आम्हां पोळ्याताज्या
मुद्दल तसेचं राहिले
फेडत राहतो व्याजा
आमच्या सणा साठी
वाढवून बसतो बोझा
प्राणी असूनि आम्ही
माणसा वरचा दर्जा
हसत राहतो पोशींदा
झेली ऋणाचा ओझा
3)
बैल दिवाळी ..
सण आला पोळ्याचा
अवस असे आगळी
बळीराजाच्या घरात
सजे आमची दिवाळी
बैल ना लेकरे आम्ही
आई आम्हां ओवाळी
अभ्यंग स्नान दिवाळी
जोरात चाले आंघोळी
शिंग अंग सजवलेले
बाशींग छान कपाळी
तो खाई भाकर शिळी
आम्हांस पुरण पोळी
झुल आम्हांस भरजरी
माया त्याची ही भोळी
बायकोच्या अंगावरती
फाटके लुगडे चोळी
कर्जाचा वाढता बोझा
राजाच्या हाती झोळी
तरीही बाप उत्साही
ममता भलती खुळी
4)
पोळा रे ..
अवकाळी पावसाळा
कंटाळे या दुष्काळा
दर वर्षीच्या नवनवीन
निसर्गाच्या नानाकळा
ढवळ्या पवळ्या तव
करे साधेपणाने पोळा
वेदना तुझ्या बापाची
समजून घे लडिवाळा
महागाई त्रस्तते भारी
पोटात आणते गोळा
भयभीत कोरोना ग्रस्त
आप्तेष्ट न केले गोळा
रंगवले नाही रे तुजला
लावला कपाळा टिळा
साधे पणात हा उत्सव
घाले जुन्या घुंगरमाळा
ठरवितो पुढील वर्षात
करू या जोरात पोळा
येईना चांगले दिवस ते
वाट पाहे बाप रे भोळा
-- हेमंत मुसरीफ पुणे
97 3030 6996
www.kavyakusum.com

