shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोणी काळभोर येथे १०१ लक्ष्मीतरू झाडांचे रोपन- श्री.बाळकृष्ण शिवराम पाठक


शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन) 
लोणी काळभोर  तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर लोणी काळभोर येथील डोंगर परिसरात दि.१९ ऑगस्ट २०२२ रोजी  श्री .बाळकृष्ण शिवराम पाठक.उबाळे नगर ,वाघोली.

  यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण प्रसंगी लक्ष्मीतरू,वड,पिंपळ,कडुलिंब,  अशा ३ फुटी १०१ देशी झाडे लावुण वाढदिवस साजरा करण्यात आला.
          लक्ष्मीतरू झाडाबद्दल महिती       
   लक्ष्मीतरूच्या झाडाची पाने व पानाचा अर्क तापावर उपचार करण्यासाठी वापरतात.पानांचा कडवटपणा नैसर्गिक प्रतिबंधात्मक क्षमता वाढविते. कर्करोग व ट्युमरच्या उपचारात लक्ष्मीतरुचा झाडाचा उपयोग केला जातो.आधुनिक कर्करोगावर उपचार करण्यासाठी ते वापरले जाऊ शकते.लक्ष्मीतरू मध्ये खूप चांगले जीवाणुरोधक,
अँटी-ट्युमरस गुणधर्म असतात. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ट्यूमर आणि दुय्यम संसर्गाचा आकार कमी करण्यासाठी लक्ष्मीतरू प्रभावी ठरते. पहिल्या / दुस-या टप्प्यात कर्करोग बरा करणे हे फार प्रभावी आहे, परंतु नंतरच्या काळात ते जीवनशैलीची गुणवत्ता वाढवू शकतात. भूक आणि पचन सुधारण्यास मदत करते. तसेच जठराची सूज, अपचन, य, चिकनगुनिया यावर सुद्धा प्रभावी आहे. झाडाच्या सालीमध्ये ही खूप औषधी गुणधर्म आहेत. अशी महिती प्रभाकर जगताप यांनी दिली. 
          या वेळी श्री .बाळकृष्ण शिवराम पाठक,ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, डॉ.महेश मांजरे, ऑर्ट ऑफ लिविग चे अजित रनसिंग, शाश्वत विकास फाऊंडेशन अध्यक्ष प्रभाकर जगताप , आकाश सर जाधव उपस्थित होते.
तसेच ग्रीन फाऊंडेशन, वनविभाग लोणी काळभोर, वनव्यवस्थापन समिती, उपस्थित होते.
close