प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : २१ / हार्मनी इंटरनॅशनल स्कूल, अहमदनगरच्या अध्ययन विभाग प्रमुख सौ.सुवर्णा समीर पळसकर यांना नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यानिमित्त विद्यालयाचे प्राचार्य श्री. अशोक बेरड यांच्यातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
इंग्रजी भाषेतील 'ॲपलाईड लिंगविस्टिक' विषयात त्यांना ही पदवी प्राप्त झाली. त्यासाठी त्यांना डॉ.सतीश भास्कर देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. हार्मनी इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
पळसकर यांनी पीएचडी मिळविल्याने सर्व स्तरातुन त्यांचे कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

