shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिगवन रोटरी क्लब ने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल पुणे जिल्ह्यातून बेस्ट प्रेसिडेंट म्हणून भिगवण रोटरी क्लब अवॉर्डने सन्मानित

भिगवन रोटरी क्लब ने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल पुणे जिल्ह्यातून बेस्ट प्रेसिडेंट म्हणून भिगवण रोटरी क्लब अवॉर्डने सन्मानित .
इंदापूर-भिगवण : दि ५ भिगवन रोटरी क्लब ने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल पुणे जिल्ह्यातून बेस्ट प्रेसिडेंट म्हणून भिगवण रोटरी क्लब अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
.१४० क्लब पैकी टॉप तीन मध्ये भिगवण चा समावेश. अध्यक्ष संजय खाडे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामाची दखल घेऊन यांचा सन्मान करण्यात आला. .डिस्ट्रिक्ट गव्हर्नर  रो. पंकज शहा यांच्या उपस्थित व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 
यावेळी रोटरी क्लब भिगवन चे अध्यक्ष संजय खाडे म्हणाले की,गेल्या वर्षभरामध्ये रोटरी क्लबचे सात हि फोकस एरिया मध्ये प्राविण्‍याने काम करण्यात आले. त्यामध्ये  शांतता निर्माण आणि संघर्ष प्रतिबंध, रोग प्रतिबंधक उपचार,पाणी स्वच्छता आणि स्वच्छता,साहित्य आणि बाल आरोग्य,मूलभूत शिक्षण आणि साक्षरता,पर्यावरण अश्या रोटरी ने दिलेल्या मुलभूत विषयांवर २०२१ -२२ कार्यकाळात काम झाले . यापैकी जिथे कमी तिथे आम्ही या शब्द रचणेप्रमाणे खाडे यांनी आपले कौशल्य दाखवत कार्याचा वाढता आलेख सुरु ठेवला. भिगवण व परिसरात व शेजारील भागात रोटरी क्लब चे कार्य तळागाळातील मुळापर्यंत पोहचवण्यासाठी व गरजूना मदत देण्याचे कार्य भिगवण रोटरी क्लब ने करण्यात आले. वरील सर्व कामे केवळ रोटरी क्लब ऑफ भिगवण च्या सर्व  डायरेक्टर व सदस्यांच्या सहकार्याने मला करता आले 
सन २०२१-२२ या कार्यकाळात मिळालेले पुरस्कार

महत्वाचा पुरस्कार - पुणे जिल्ह्यातून बेस्ट प्रेसिडेंट टॉप तीन ने भिगवण रोटरी क्लब अवॉर्ड, त्याचबरोबर फाईव्ह स्टार क्लब परफॉर्मन्स,बेस्ट सिपीआय परफॉर्मन्स इन झोन- Second अवार्ड, वॉटर अँड सॅनिटायझेशन मध्ये थर्ड, मेंबर १०० टक्के मेंबरशिप  ग्रोथ ७ स्टार ,डोनर क्लब भिगवण असे नानाविध २५ पेक्षा जास्त पुरस्कारणे सन २०२१ -२२ या कार्यकाळात खाडे यांनी क्लब च्या सहकार्याने रोटरी च्या माध्यमातून भिगवण क्लब चे नाव लौकिक करण्यात आले. या कार्याचे  कौतुकास्पदाची थाप मिळत आहे... याबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील शाळांमध्ये २५ स्मार्ट टीव्ही चे प्रोजेक्टर बसवण्यात आले तसेच कुंभरगाव हे चार क्लब एकत्र येऊन हॅपी व्हिलेज बनवण्याचे काम चालू आहे या वर्षामध्ये नवीन इन्ट्रॅक  क्लब व रोट्रेक क्लब ही नविन तयार करण्यात आले आहेत रोटरी युथ एक्सचेंज मध्ये ही चांगल्या प्रकारे विद्यार्थी देण्यात आले होते परिसरातील ९ शाळा ग्लोबल ग्रँड च्य माध्यमतूनन हॅप्पी स्कूल करण्यात येणार आहेत आसे नवणाविन १७० पेक्षाही जास्त प्रोजेक्ट करण्यात आले आहेत 
रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय खाडे, सचिव सुषमा वाघ, माजी अध्यक्ष संपत बंडगर, नामदेव कुदळे, महेश शेंडगे, प्रदीप वाकसे, प्रवीण वाघ, फाउंडेशन डायरेक्टर वैशाली बोगावत, रेखा खाडे, व नूतन अध्यक्ष डॉक्टर अमोल खानावरे, हे सर्व त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते
close