उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी भरारी घेणारा युवक म्हणजेच रहिमान शेख.
अभिष्टचिंतनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील स्व कष्टातून आणि उपजत कलेच्या माध्यमातून फॅब्रिकेशन व्यवसायामध्ये सर्वांना सामावून घेत मैत्रीचा संबंध जोपासत यशोमय भरारी घेऊन यशस्वी उद्योग करणारा युवक म्हणून ज्यांची ओळख आहे असे वडापुरी चे सुपुत्र रहमान शेख यांचा अभिष्टचिंतन दिन आज होत असून त्यांना त्यांच्या चाहत्याकडून शुभेच्छाचा वर्ष होत असताना दिसून येत आहे.
उद्योग व्यवसायामध्ये आपले स्थान दर्जात्मक विश्वास आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ टिकवणे यासाठी लागणारी कसब याचे उत्तम उदाहरण म्हणजे रहमान शेख आहे. उद्योग व्यवसाय बरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य मुस्लिम चारिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून ते इंदापूर तालुक्यामध्ये करीत आहेत. फॅब्रिकेशन व्यवसायामध्ये त्यांनी अनेक युवकांना प्रशिक्षण देऊन व्यवसाय क्षेत्रामध्ये सक्षम करण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यांना मित्रपरिवाराचाही विशेष सहकार्य लाभलेले दिसून येत आहे.

