प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : ५ / अहमदनगर मध्ये स्टेरॉईडने अखेर एका तरुणाचा बळी घेतलाय. दोन दिवसांपूर्वी नगर शहरातील लंकेश चितळकर याने स्टेरॉईड न मिळाल्याने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली होती. यामध्ये लंकेश हा ८० ते ९० % भाजल्याने त्याला उपचारासाठी पुण्यातील सूर्या हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आले होते.
लंकेशचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. स्ट्युराॅईड ट्रिमरच्या वापरावर कायद्यानं बंदी आहे. मात्र नगरमध्ये स्ट्युराॅईड ट्रिमरचा जो धुमाकूळ चालला आहे, त्यातून अक्षरश: लंकेश चितळकर या तरुणाचा मृत्यू झालाय. नगर शहरात सर्रासपणे स्टेरॉईड विकणारे हे मृत्युंचे दलाल आहेत. त्यामुळे आता नगरचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या मृत्युच्या दलालांना वेळीच आवर घालण्याची मागणी नगरकरांमधून केली जात आहे. बेकायदेशीररित्या स्ट्युरॉईड विकणाऱ्यांवर कारवाई झाली तरच नगरमधील तरुणांचे प्राण वाचतील. अन्यथा आगामी कालखंडात तरुणाई मृत्युच्या विळख्यात अडकण्याची चिन्हे आहेत.

