shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगरचे बीजपुत्र अमोल डाके यांचा मा.सभापती प्रविणदादा कोकाटे यांनी केला सन्मान

 प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : ४ / अहमदनगरचे बीजपुत्र अमोल डाके यांचा मा.सभापती इंजि.  प्रविणदादा कोकाटे यांच्या हस्ते य थोचित सन्मान करण्यात आला.

वैयक्तिक कामे सांभाळून अशा प्रकारचा छंद पर्यावरणप्रेमी अमोलने जोपासला व अतिशय मोठे समाज उपयोगी कार्य त्याच्या हातून घडले. यामुळेच त्याला जागतिक विक्रम घडवता आला,असे मनोगत यावेळी मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांनी व्यक्त केले.

नगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथील रहिवासी असलेल्या अमोल डाके या युवकाने कोरोना लॉकडाऊनच्या काळात ७३ प्रकारच्या झाडांचे एक कोटी पेक्षा जास्त झाडांच्या बिया जमा केल्या होत्या.

वनविभाग,शाळा,वेगवेगळ्या सरकारी खाजगी संस्था,झाड लावण्याची आवड असणाऱ्या लोकांना या झाडांच्या बिया दिल्या आहेत.या कार्याची दखल घेत जागतिक विक्रम करत वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नाव नोंदवले आहे. झाडांचे गावरान वाण शोधणे, बिया लागवड करणे, झाडांच्या बिया काढून त्या संकलित करणे, त्या इतरांना लावण्यासाठी देत त्यांना प्रेरणा देणे, वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आपले नाव कोरले आहे. 

या उल्लेखनीय कामगिरीमुळे जगभरात अहमदनगर ची मान नक्कीच उंचावली आहे. यावेळी सी. ए. केतन साबळे, नानासाहेब कोकाटे,विजय भालेकर, अमोल काकडे, सागर निकाळजे उपस्थित होते .
close