shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कबड्डी राज्य अजिंक्य स्पर्धा अहमदनगरमध्ये होणार ; तब्बल ३० वर्षानंतर स्पर्धा होणार असल्याने जिल्हा संघटनेमध्ये उत्साह..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक ०४ ऑगस्ट २०२२

कबड्डी राज्य अजिंक्य स्पर्धा अहमदनगरमध्ये होणार ; तब्बल ३० वर्षानंतर स्पर्धा होणार असल्याने जिल्हा संघटनेमध्ये उत्साह..!!

अहमदनगर : ७० वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धा अहमदनगरमध्ये घेण्यास कबड्डी संघटनेचे राज्य अध्यक्ष अजित पवार यांनी मान्यता दिली. त्यामुळे तब्बल ३० वर्षानंतर राज्य अजिंक्य स्पर्धा अहमदनगरमध्ये होणार आहे. या स्पर्धा डिसेंबरमध्ये अहमदनगर शहरातील रेसिडेन्शिअल कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर होतील. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दादा कळमकर आणि सचिव शशिकांत गाडे यांनी ही माहिती दिली.
राज्य अजिंक्यपद स्पर्धा अहमदनगरमध्ये व्हावी यासाठी पद्मश्री पोपटराव पवार, माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके यांनी पाठपुरावा केला.


स्पर्धेच्या नवीन नियमानुसार या स्पर्धा मॅटवर होणार आहेत. स्पर्धेसाठी कोल्हापूर येथून प्रेक्षागॅलरी मागवली जाणार आहे. किमान २५ हजार प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था यामुळे होईल. राज्यातील २५ जिल्ह्यांमधून पुरुष आणि महिलांचे संघ अहमदनगरमध्ये येतील. या सर्वांची व्यवस्था जिल्हा संघटनेकडून होणार आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

 

close