shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ.सुधिर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल राजु झोडेंनी केले त्यांचे अभिनंदन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी-किरण घाटे.
मंगळवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२२

आ.सुधिर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल राजु झोडेंनी केले त्यांचे अभिनंदन..!!

चंद्रपूर : राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपा- शिंदे गटाच्या मंत्रिमंडळात आज स्थान मिळाल्याबद्दल उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. 
        राज्याचे अर्थमंत्री असतांना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली त्यामुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली होती. ड्रग्स, चरस, गांजा अशा मादक पदार्थाचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले होते. दारूबंदीमुळे या जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढून कित्येकांची कुटुंब उध्वस्त झाली होती. 

       आ. मुनगंटीवार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यामुळे त्यांनी या जिल्ह्यातील दारू पुनश्च बंद करावी व वाढलेली गुन्हेगारी कमी करावी तसेच निर्जीव विकासासोबत जनतेच्या मूलभूत विकासावर भर द्यावा व या जिल्ह्याची प्रगती करावी अशी अपेक्षा राजू झोडे यांनी व्यक्त केली. 
कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त झाल्यावर जिल्ह्यासोबतच या राज्याच्या सजीव विकासावर भर द्यावा अशी आज नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर राजू झोडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @किरण घाटे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी📲+91 92844 99128
close