shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घूग्घुसला शिवसेना महिला आघाडीची बैठक पार पडली..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी-किरण घाटे.
मंगळवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२२

घूग्घुसला शिवसेना महिला आघाडीची बैठक पार पडली..!!

घूग्घुस (चंद्रपूर) : घूग्घुस येथील स्थानिक विठ्ठल मंदीरात नुकतीच शिवसेना महिला आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली .
⬜▪️शिवसेना महिला आघाडीच्या पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख शिल्पा बोडखे यांच्या उपस्थितीत व चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या संघटिका उज्ज्वला नलगे व वर्षा कोठेकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.
बैठकीला उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या वेळी पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले. आयोजित बैठकीत घूग्घुस शिवसेना महिला आघाडीची कार्यकारणी घोषित करण्यात आली.

⬜▪️घूग्घुस शहर शिवसेना महिला आघाडी प्रमुख संध्या जगताप, उपशहर प्रमुख संगीता देवराव बोबडे, गायत्री नाने यांना पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख शिल्पा बोडखे यांच्या पत्राद्वारे नियुक्तीपत्र देऊन त्यांची पदावर नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.बैठकीला शहरातील शिवसैनिक महिला उपस्थित होत्या.

या वेळी शिवसेना नेते बाळू चिकनकर, उपतालुका प्रमुख गणेश शेंडे, युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, माजी शहरप्रमुख बंटी घोरपडे, अजय
 जोगी, शहंशाह शेख, महिला आघाडीच्या सखुबाई मोहितकर, सुमन बांदूरकर, ताराबाई बोबडे, मनीषा चौधरी, निर्मला खनके, निलीमा हिरादेवे, वंदना बांदूरकर, सविता सोनटक्के, 
सुलोचना पिंपळकर आदीं हजर होते.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @किरण घाटे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी📲+91 92844 99128
close