shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बहिण भावांच्या अतुट प्रेमाचे नाते जपणारा रक्षाबंधन सण येत्या ११ तारखेला !! चंद्रपूरची बाजारपेठ सजली विविध आकर्षक व मनमोहक राख्यांनी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी-किरण घाटे.
मंगळवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२२

बहिण भावांच्या अतुट प्रेमाचे नाते जपणारा रक्षाबंधन सण येत्या ११ तारखेला !! चंद्रपूरची बाजारपेठ सजली विविध आकर्षक व मनमोहक राख्यांनी..!!
चंद्रपूर : बहिण भावांच्या अतुट प्रेमाचे पवित्र तथा विश्वासाचे नाते जपणारा रक्षाबंधन सण येत्या ११ऑगस्टला होवू घातला आहे.या निमित्ताने चंद्रपूर नगरीची बाजारपेठ विविध आकर्षक मनमोहक व लक्षवेधक राख्यांनी सजली असल्याचे या प्रतिनिधीने आज बाजारपेठेचा फेरफटका मारला असता दिसून आले.
       दरम्यान या सणा निमित्त चंद्रपूर शहरातील गोलबाजार , जटपूरा गेट, बंगाली कॅम्प ,रामनगर या सह अन्य ठिकाणी राख्यांची अनेक दुकाणे गेल्या १५ दिवसांपासून थाटल्या गेली आहे.
कोरोना महासंकटात गेली दोन वर्षं राखी विक्रेते समाधान कारक व्यवसाय करू शकले नव्हते .यंदा चांगला व्यवसाय होईल असे त्यांना वाटत आहे.
पण राखी सण अवघ्या तीन दिवसांवर येवून सुध्दा राख्यांच्या दुकाणात म्हणावी तशी महिलां व तरुणींची गर्दी नाही. 
   या वेळेस बाजारपेठेत सुरत , अहमदाबाद, गुजरात या ठिकाणाहून एडी ,साजन एम.आर.बिंडल, शुभ आदीं कंपनीच्या आकर्षक राख्या व मनमोहक रेशीम धागे उपलब्ध झाले आहे.छोट्या आकारांच्या राख्यांना महिलांनी विशेष पसंती दिली असल्याचे शहरातील एक राखी विक्रेता अनुप कपूर यांनी या प्रतिनिधीशी आज बोलतांना सांगितले.
 या शिवाय बाजारात पाच रुपयांपासून तर दोनशे रुपयां पर्यंत विविध प्रकारच्या राख्या विक्रीला उपलब्ध असल्याचे शैलैश वनकर व प्रफूल टिपले यांनी सांगितले.

या वर्षि म्हणावा तसा ग्राहकांचा प्रतिसाद या व्यवसायाला नसल्याचे ते राखी विक्रेते म्हणाले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @किरण घाटे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी📲+91 92844 99128
close