राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने पोलीस बांधव व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना राखी बांधून केले रक्षाबंधन साजरे.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशन येथील पोलीस बांधव व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.
इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशन येथील नागरिकांच्या सेवेसाठी, रक्षणासाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवांना बहिण म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस महिला इंदापूर तालुका अध्यक्षा छायाताई पडसळकर ,इंदापूर शहर अध्यक्षा उमाताई इंगोले, उपअध्यक्षा उज्वलाताई चौगुले यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पक्ष कार्यालयामध्ये राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला.
यावेळी छायाताई पडळकर म्हणाल्या की, नागरिकांच्या रक्षणासाठी कर्तव्यावर असणारे पोलीस बांधव व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सतत आम्हा बहिणींचे रक्षण करणारे आमच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणारे बांधव यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करताना विशेष आनंद होत आहे. त्यांच्या या खंबीर पाठिंब्यामुळे आम्ही महिला सक्षमीकरणाचे कार्य अधिक गतीने करीत आहोत.

