१६४) पर्यावरण जनजागरण, राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता..
जलाशये हवीत कशासाठी ?
नगरेची रचावी । महावने लालावी। जलाशय निर्माण। नानापरी ।।
असे ज्ञानेश्वर माऊलीने लिहिलेले आहे. जलाशय म्हणजे आपल्या गावात असलेली तळी, मोठी सरोवरे, नद्या, नाले, पाणवठे.
प्रत्येक गावामध्ये जलाशये म्हणजे पाण्याचा मोकळा स्त्रोत, साठा असावा. याचे वैज्ञानिक कारण असे की पाणी हे एक संयुग आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन (प्राणवायू) यापासून ते तयार होते. जेव्हा या पाण्यावर सूर्यकिरणे पडतात तेव्हा नैसर्गिकरित्या पाण्याची वाफ होते व ही वाफ हवेत मिसळते. आकाशात जाते आणि त्यातून पर्जन्य म्हणजे पाऊस पडतो. आता ही पाण्याची वाफ जेव्हा वातावरणात पसरते त्यावेळेला मोठ्या प्रमाणात प्राणवायू आणि हायड्रोजन आपल्यालाही मिळतो. ज्यामुळे आपले आरोग्य सुदृढ होते. सद्यस्थितीत वाढत्या शहरीकरणामुळे अनेक जलाशये बुजविली जात आहेत. नाले बंद केले जात आहेत. त्यामुळे नैसर्गिक डोहाला मिळणारा पाणीपुरवठा बंद होतो व हे डोह देखील नामशेष झालेले आहेत. पर्यायाने त्यांतून निर्माण होणारी पाण्याची वाफ बंद झाली. आपल्याला प्राणवायू मिळणे बंद झाले. हे सर्व आपण आपल्यावर लादलेले संकट आहे. पर्यावरणाच्या नाशास हे शहरीकरण कारणीभूत ठरत आहे. आपल्याला भरपूर प्राणवायू हवा असेल तर जलाशयाची सुरक्षा करणे गरजेचे आहे. याबाबत प्रत्येकाने आत्मचिंतन करावे व जलाशयांच्या सुरक्षिततेसाठी व नवनिर्मितीसाठी प्रयत्न करावेत.
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या पर्यावरण जनजागरण, राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता उपक्रमांतर्गत प्रत्येकाने आत्मचिंतन करावे व जलाशयांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करावेत.
लेखक :
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने, देशभक्तकोशकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

