प्रा. दिलीप सोनवणे, अशोक कटारे, उज्ज्वला पाचारणे, विजयश्री सावजी, प्रा.कु.सोनाली सोनवणे यांना घोषित
श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे (इंदिरानगर) भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव राज्यस्तरीय उपक्रम अंतर्गत कविता, निबंध, पुस्तक परीक्षण, लेख,देशभक्ती या विषयावर घेतलेल्या लेखनामध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेले संगमनेर येथील सेवानिवृत्त प्रा.दिलीप सुखदेव सोनवणे,खैरी येथील खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलचे शिक्षक अशोकराव भीमनाथ कटारे, टाकळीभान येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेतील शिक्षिका उज्ज्वलाताई गोरखनाथ पाचारणे,बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील सौ. विजयश्री शैलेश सावजी, रयत शिक्षण संस्थेच्या रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयातील किमान कौशल्य विभागातील मराठी विषय प्रा. कु.सोनाली विजय सोनवणे यांना राज्यस्तरीय देशभक्ती लेखन पुरस्कार घोषित झाले आहेत.
वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये, राहाता येथील शारदा ज्युनिअर कॉलेजचे प्रा.डॉ. शिवाजी काळे, उंबरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील शिक्षक डॉ.रामकृष्ण जगताप, खोकर येथील गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका कवयित्री संगीता फासाटे,वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष सौ. मंदाकिनी उपाध्ये, कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये या परीक्षक समितीने हे पुरस्कार घोषित केले. अमृतमहोत्सवी भारतीय स्वातंत्र्यदिनी १५ आगस्ट २०२२ रोजी हे राज्यस्तरीय देशभक्ती लेखन पुरस्कार सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तके देऊन प्रदान करण्यात येणार आहेत. असे संयोजकांनी सांगितले.

