शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०२ ऑगस्ट २०२२
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय पुरस्कारांची घाेषणा..!!
किशाेर बेडकिहाळ यांना जीवनगाैरव पुरस्कार जाहीर..!!
अहमदनगर : पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घाेषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत आणि पुराेगामी चळवळीतील कार्यकर्ते किशोर बेडकिहाळ (सातारा) यांना यंदाचा पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गाैरव पुरस्कार देऊन गाैरविण्यात येणार असल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष डाॅ. रावसाहेब कसबे यांनी दिली.
पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार बुलढाण्याचे रवींद्र इंगळे-चावरेकर यांच्या ‘सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास’, या संशाेधन ग्रंथास, पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार पुणे येथील मंगेश नारायण काळे यांच्या ‘चित्र संहिता’ या समीक्षा ग्रंथास, पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार संगमनेर येथील के. जी. भालेराव यांच्या ‘तामसगीर माणसं’ या ललित लेखनास, पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार संगमनेरच्या हिरालाल पगडाळ यांच्या ‘इलेक्शन बिलक्शन’ या पुस्तकाला दिला जाणार आहे.
यावेळचा पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय समाज प्रबाेधन पुरस्कार परिवर्तनाचा वाटसरू या पत्रिकेचे संपादक अभय कांता यांना देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार नांदेड येथील दत्ता भगत यांना, तर राज्यस्तरीय कला गाैरव पुरस्कार संगमनेरमधील कलावंत छबुबाई चव्हाण यांना देण्यात येणार आहे. पुरस्काराचे यंदाचे ३२ वे वर्षे असून, पुरस्काराचे वितरण ११ ऑगस्टला प्रवरानगर येथील धनंजय गाडगीळ सभागृहात वितरीत करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत ससाणे, आमदार राधाकृष्ण विखे, खासदार डाॅ. सुजय विखे यांच्या उपस्थित पुरस्कारांचे वितरण हाेणार आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

