shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेडणी येथे १५१ राष्ट्रध्वजाचे ग्रामस्थांना वाटप

रेडणी येथे १५१ राष्ट्रध्वजाचे ग्रामस्थांना वाटप 
इंदापूर प्रतिनिधी:रेडणी येथे गावातील युवकांनी एकत्र येत १५१ राष्ट्रध्वजाचे नागरिकांना शुक्रवारी मोफत वाटप केले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त युवक वर्गाला राष्ट्रहित लक्षात घेऊन नागरिकांना घरावर फडकविण्यासाठी राष्ट्रध्वज वितरित करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार रेडणी गावातील युवकांनी हा उपक्रम राबविला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार शनिवार दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरावर उंच असा राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन यावेळी युवा नेते अमरदीप काळकुटे, उपसरपंच प्रकाश शेडगे, प्रफुल्ल चव्हाण आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.

close