shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आगामी निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काँग्रेस बळ देणार -- आदित्य पाटील , राजेसाहेब देशमुख!!

 शहरात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अझादी गौरव यात्राची दिमाखात मिरवणूक : काँग्रेसचे जोरदार शक्ती प्रदर्शन 



 प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :- 

देशभरात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या आदेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त "आझादी गौरव यात्रा ,भारत जोडो अभियान "करण्यात येत आहे.




याच धर्तीवर खासदार रजनी पाटील व माजी मंत्री अशोक पाटील तसेच युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील व जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या समर्थ नेतृत्वात शहरातून जाणाऱ्या मुख्य राष्ट्रीय महामार्गावरून जोरदार रॅली चे आयोजन करण्यात आले होते.ह्या रॅली च्या निमित्ताने तालुका काँग्रेसचे नारायण होके ,दत्ता कांबळे,अफरोज तांबोळी,महावीर मस्के यांनी शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

यावेळी अझादी गौरव यात्रा ही शहरा नजिक असलेल्या फुले पिंपळगाव येथून ढोल ताशा आणि फटाक्यांच्या अतिशय बाजीने सुरू होऊन ,शहरातील छत्रपती संभाजी चौक ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक,इंदिरा नगर उर्दू शाळेत शालेय साहित्य वाटप करून , छत्रपती शिवाजी चौक येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते पात्रुड येथे समारोप करण्यात आला .

यावेळी पात्रुड येथील भारत जोडो अभियान समारोप सभेत युवक काँग्रेसचे सरचिटणीस आदित्य पाटील व जिल्हा काँग्रेसचे दबंग अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी आगामी निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काँग्रेस बळ देणार असे एकमुखी आश्वासन काँग्रेस कार्यकर्ते व उपस्थित जनसमुदायास दिले .या रॅलीचे आयोजन करण्यासाठी नारायण होके ,दत्ता कांबळे,अफरोज तांबोळी,महावीर मस्के,अहमद शेख , ॲड.इनामदार , करामा चाऊस ,सय्यद आयास ,भैया गायकवाड , रुद्रा कासार, समिउद्दिन अन्सारी ,रणजित कसबे ,मुसा भैया ,अनिस शेख , जानू शहा , तब्रेज, सह तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

close