प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियान हा उत्सव सर्वांनी आपल्या घरी तिरंगा लावून देशाचा अमृत महोत्सव साजरा करावा असे देश देशवासीयांना आवाहन केले आहे . त्याचाच एक भाग म्हणून आज भारतीय जनता पार्टी माजलगावच्या वतीने व्यंकटेश हॉल येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीचे अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते रमेश आडसकर हे होते .
प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा नेते छत्रपती सहकारी कारखान्याचे व्हॉइस चेअरमन मोहन जगताप ,बबन सोळंके , अरुण राऊत , डॉक्टर भगवान सरवदे , नितीन नाईकनवरे, ज्ञानेश्वर मेंडके , मा नगराध्यक्ष अशोक तिडके , जगदीश साखरे, माणिक दळवे उपस्थित होते. यावेळी बोलताना आडसकर साहेब म्हणाले प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर झेंडा लावून या अभियानात सहभागी व्हावे तसेच झेंड्याचा कुठेही अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच आपल्या सर्वांना अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा लावण्याची संधी मिळत आहे हे आपले भाग्य त्यामुळे ही संधी कोणीही गमावू नये व हा क्षण आपल्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असेल असे म्हणाले. तसेच मोहन जगताप या यावेळी बोलताना म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी जीवाची परवा न करता बलिदान दिले अनेक स्वातंत्र्य सेनानी यांनी संघर्ष केला.
अनेकांना शिक्षाही झाली तेव्हा हे स्वातंत्र्य मिळाले आहे परंतु आज अनेक नवतरुण पिढीतील मुलं रोजच्या स्पर्धेच्या युगामध्ये व व्यस्ततेमुळे विसरत आहे त्यामुळे अशा अभियानातून अनेकांना प्रेरणा मिळेल तसेच ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले त्याग केला ही त्यांची देशाविषयी असलेली भावना या नवीन पिढीमध्ये निर्माण व जागृत होईल असे सांगितले . तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बबन सोळंके ,भगवान सरवदे ,ज्ञानेश्वर मेंडके, नितीन नाईकनवरे, डॉ अशोक तिडके यांनी आपले विचार मांडले व मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण राऊत यांनी केले यावेळी अरुण राऊत म्हणाले. शहरातील सर्व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक घरामध्ये तिरंगा झेंडा कसा पोहोचेल व सर्वजण या अभियानामध्ये कसे सहभागी होतील व तिरंगा चा अवमान होणार नाही म्हणून कुठली काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे असे सांगितले . माजलगाव शहरामध्ये 13 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून चौकामधून मोटरसायकलवर रॅली काढण्यात येईल असे सांगितले व या मोटरसायकल रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले बैठकीला सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नगरसेवक शक्ती प्रमुख बूथ प्रमुख सरपंच व सर्व आघाड्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब आगे यांनी केले .शेवटी कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आली.


