shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाखेवाडी युवाशक्ती ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्त वृक्षारोपण.

लाखेवाडी युवाशक्ती ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्त वृक्षारोपण.
इंदापूर प्रतिनिधी:लाखेवाडी युवाशक्ती ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वृक्ष लागवड करून पर्यावरण पूरक कार्यक्रम राबवून समाजामध्ये पर्यावरणाविषयी प्रेम भावना निर्माण करण्याचे कार्य या युवाशक्तीच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिननिमित्त होत असताना दिसून आले आहे. युवक हा देशाच्या विकासाचा आधार आहे. त्यांना योग्य दिशा देण्याचा निर्धार लाखेवाडी युवाशक्ती ग्रुप च्या वतीने केल्याने त्यांचे शेतकरी वर्गाकडून विशेष कौतुक केले जात आहे.
यावेळी संघटक गणेश बागल,मनोज नाईक, बंटी जाधव,सूरज सानप,तेजस सानप,हर्षवर्धन साठे,विकास जाधव,युवराज शिंदे,ओमकार सानप,घनःश्याम कुंभार,माऊली बागल,समाधान बागल इत्यादी युवक उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर १२ ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विशिष्ट पैलूवर चर्चा घडवून आणली जाते. यावर्षी ‘शांती स्थापनेत युवकांचा सहभाग’ (युथ बिल्डींग पीस) हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे. सृजनशील अशा युवा शक्तीच्या माध्यमातून जगभरात शांततेची स्थापना व्हावी हा यामागचा विचार आहे.
संयुक्त राष्ट्रांनी १९८५ मध्ये पहिले आंतरराष्ट्रीय युवा वर्ष साजरे केले. या घटनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त १९९५ मध्ये जगातील युवावर्गाच्या स्थितीत अनुकुल बदल घडवून आणण्यासाठी ‘वर्ल्ड प्रोग्राम ऑफ ॲक्शन फॉर युथ’ स्वीकारण्यात येऊन त्या माध्यमातून मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्षण, रोजगार, गरिबी, आरोग्य, पर्यावरण, सहभाग, जागतिकीकरण, युवक आणि संघर्ष, एचआयव्ही एड्स आदी १५ क्षेत्रांची निवड प्राध्यान्याने केली. युवकांना मिळणाऱ्या संधींची संख्या वाढविणे, त्यांची गुणवत्ता वाढविणे आणि त्या माध्यमातून समाजासाठी युवकांचे योगदान वाढविणे यादिशेने या कार्यक्रमाद्वारे चांगले प्रयत्न झाले आहेत.

लिस्बन येथे 8 ते 12 ऑगस्ट 1998 दरम्यान पार पडलेल्या युवकांशी निगडीत मंत्र्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत 12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याची शिफारस करण्यात आली आणि त्यावर 17 डिसेंबर 1999 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून हा दिवस युवा दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो
close