shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य'निमित्त वाचन संस्कृतीतर्फे लेखनस्पर्धेचे आयोजन..!'

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : येथील इंदिरानगरमधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने कविता, निबंध आणि पुस्तक परीक्षण लेखनस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी दिली. 

        'हर घर तिरंगा 'या विषयावर कवितालेखन संगीता फासाटे, इंदिरानगर, श्रीरामपूर जि. अहमदनगर मोबा.नं. 9518900578 तसेच 'अमृतमहोत्सवी भारतीय स्वातंत्र्य 'या विषयावर निबंधलेखन डॉ.शिवाजी काळे, गुरुनानकनगर, गोंधवनणी रोड, श्रीरामपूर मोबा.नं. 9960607633 आणि 'मला आवडलेले स्वातंत्र्यचळवळीवरील पुस्तक' परीक्षण डॉ.रामकृष्ण जगताप,वॉर्ड नं ०१, बोरावकेनगर, श्रीरामपूर मोबा.नं. 8668290554 या पत्यावर संपर्क करून असे तीन विभागात  १० आगस्ट २०२२ पर्यंत लेखन करून पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

       कविता १६ ते २० ओळींची एक पान असावी, निबंध व पुस्तक परीक्षण  ०४ ते ०५ पानापर्यंत किंवा १००० शब्द असावेत. विषय स्पर्धेत प्रथम क्रमांक येणाऱ्यास  देशभक्ती लेखन पुरस्कार सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुस्तकेभेट देण्यात येतील असे संयोजकांनी कळविले आहे.
close