*भिमाई आश्रमशाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी*.
*अण्णाभाऊंनी शिवरायांचे चरित्र पोवाड्याच्या माध्यमातून नेले साता समुद्रापार.* :- *नानासाहेब चव्हाण यांचे गौरोद्गार*
*इंदापूर* :- ( दि.१) लाखो रशियन शिवप्रेमीं जनतेसमोर मॉस्कोच्या भव्य लेनिन चौकात छत्रपती शिवरायांचे चरित्र पोवड्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंनी गायले. बहुजनांच्या, शोषितांच्या वेदनांचा शाहीर ,लेखक अण्णाभाऊ साठे आपल्या रसरशीत साहित्याने आणि कार्याने अजरामर झाले. असे गौरोद्गार भारत मुक्ती मोर्चाचे राज्याचे कार्यकारी अध्यक्ष नानासाहेब चव्हाण यांनी काढले.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
चव्हाण पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा विचार आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यांचा मेळ घालण्याचे काम अण्णाभाऊंनी आपल्या लेखणी आणि शायरीच्या माध्यमातून केले.
सहशिक्षिका मनीषा जगताप - मखरे म्हणाल्या की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अण्णाभाऊंनी मुंबईत वीस हजार कामगारांचा मोर्चा काढला. त्यात
"ये आजादी झुठी है ! देश की जनता भुखी है" ! ही प्रमुख घोषणा अण्णाभाऊंनी काढलेल्या मोर्चाची होती.असे आपल्या भाषणात मनीषा जगताप- मखरेंनी नमूद केले.
यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा शकुंतला रत्नाकर मखरे ( काकी) ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. नानासाहेब चव्हाण यांच्या हस्ते तथागत बुद्धांच्या मूर्तीस पुष्प, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेस पुष्पहार व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या ( तात्या) प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी भक्ती दीपक कांबळे,आर्या महेश रुपनवर (इ.५ वी) यांनी भाषणातून व रूपाली व दिपाली पप्पू ठोंबरे (इ.७ वी) ह्या विद्यार्थीनींनी आपल्या गीतातून लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली.
यावेळी संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे व मुख्याध्यापक, प्राचार्या, सर्व शिक्षक - शिक्षिका, अधिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले तर आभार हिरालाल चंदनशिवे यांनी मानले.

