shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शंभुराजे जगताप यांनी पांडे जिल्हा परिषद गटातून निवडणुक लढवावी....जगताप कार्यकर्त्यांची मागणी



प्रतिनिधी : सचिन जव्हेरी

करमाळा : १ /  जिल्हा परिषद पांडे गटातून जगताप गटाचे युवा नेते शंभुराजे जगताप यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी जगताप गटाच्या कार्यकर्त्यातून जोर धरू लागली आहे.

 देशभक्त कै.नामदेवराव जगताप यांच्यापासून पांडे जिल्हा परिषद गट हा जगताप गटाल खुप मोठी ताकद देत आला असून या गटात जगताप गटावर प्रेम करणारे हजारो मतदार असून जनतेच्या हितासाठी व विकासासाठी सर्वांना बरोबर घेवून चालणारे शंभुराजे जगताप हे सर्वगुण संपन्न नेतृत्व असल्यानेच मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतील अशी राजकीय जाणकारांचे मत असल्याने जगताप गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी एक पुत्र म्हणून नाही तर जनहितासाठी व जनतेच्या विकासासाठी शंभुराजे जगताप यांना जगताप गटाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे.

 शंभुराजे जगताप यांनी आजपर्यंत राजकारण डोळ्यासमोर ठेवून कधीही समाजकारण अगर कोणाचीही सदिच्छा भेट घेतलेली नाही, अगदी नाॅर्मली म्हणजेच सहजासहजी त्यांचेकडून गरजेनुसार समाजकार्य, सदिच्छा भेटी, सर्वांच्या सुख-दुःखात, लग्न समारंभाना आवर्जून उपस्थिती आणि कोणाचीही काही समस्या निर्माण झालेली असेल तर तात्काळ निवारण करण्यावर भर देणारे शंभुराजे अशी त्यांनी संपुर्ण तालुक्यात आपली ओळख निर्माण केली आहे. देशभक्त कै.नामदेवराव जगताप यांनी जगताप गटात जनहित हेच डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत संपुर्ण महाराष्ट्रात करमाळ्याची छाप उमटविलेली होती त्याच पावलावर पाऊल टाकत शंभुराजे आपले पिताश्री माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व राजकीय वाटचाल करीत आहेत. आणि हेच नेतृत्व आज लोकांना हवे असल्याने शंभुराजे जगताप यांनी पांडे जिल्हा परिषद गटातून निवडणुक लढवावी अशी मागणी जगताप गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांतून होत आहे. आजही तालुक्यातून शंभुराजे जगताप यांनी कोरोना काळातील संकट समयी गावोगावी जाऊन दिलेली मदत, दिलेला धीर, दिलेली आपुलकी याविषयी कौतुकाने चर्चा होताना दिसत आहेत.

घरातील माणसांनी, घरातील माणसांना कोरोना संक्रमण काळात दूर ठेवणे पसंत केले, पण जयवंतराव जगताप, शंभुराजे जगताप, वैभवराजे जगताप यांनी खऱ्या अर्थाने प्रजेवर जीवघेण

 संकट निर्माण झाल्यानंतर राजांनी व त्यांच्या सहकार्यांनी  जनतेला कसा धीर द्यायचा, त्यांना कसे सावरण्याचा प्रयत्न करायचा, त्यांना आपुलकीची व मायेची ऊब कशी देतात यानुसार त्यांनी तालुका वासीयांना विविध उपाययोजना, वेळोवेळी मार्गदर्शन, मास्क, सॅनिटायझर, किराणा वस्तु, गरजवंतांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला होता. तालुक्यातील जनतेशी केलेली हिच हितगुज आज जगताप गटाच्या पाठीवर कौतुकाची, विश्वासाची व आपुलकीची थाप म्हणून मतदारांतून पडणार असल्याने जगताप गटाने आता मोठ्या उत्सहाने, ताकदीने, विश्वासाने या निवडणुकीत उतरावे अशीही जाणकारांकडून चर्चा होत आहेत.
close