शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १० ऑगस्ट २०२२
⬜◼️सदगुरु गंगागिरी महाराज सप्ताहाची कोकमठाणला सांगता..!!
⬜◼️अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे सदगुरु गंगागिरी महाराजांची तपस्याच- महंत रामगिरी महाराज..!!
⬜◼️अखंड भजन भक्तीने सप्ताहात पांडुरंग येईल - महंत रामगिरी..!!
⬜◼️कोकमठाण : लाखो भाविकांची उपस्थिती...हरिनामाचा गजर गोपालकृष्ण, राधाकृष्ण... या भजनी ठेक्यावर श्री श्रेत्र कोकमठाणचा अवघा शिवार थिरकला! मानवी मनोर्यांची गर्दी...राजकिय मंडळींनी धरलेला फुगडीचा घेर...महंत रामगिरींच्या मधुर वाणीतील किर्तन...अशा मंगलमय वातावरणात कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील सदगुुरु गंगागिरी महाराज 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची मंगलमय वातावरणात सांगता झाली.
राहाता (कोकमठाण) : श्री श्रेत्र कोकमठाणच्या 180 एकर क्षेत्रात हा भव्य दिव्य सप्ताह पार पडला. महंत रामगिरी महाराजांचे सुश्राव्य किर्तन सुरु होते. भाविक भक्तीरसात तल्लीन असतानेचे वरुण राजालाही या सप्तहाला येण्याचा मोह आवरला नाही. पावसाने सुरुवातीला किरकोळ हजेरी लावली प्रसाद वाटप झाल्यानंतर व भाविक उठले त्यावेळी वरुणाने जोरदार हजेरी लावली. या सप्ताहाची सांगता काल महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.
⬜◼️स्वत:च्या सुखाकरिता जो दुसर्याला त्रास देतो, तो राक्षस-महंत रामगिरी महाराज..!!
या सोहळ्यास औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, ओरिसाच्या खासदार मजुलता, भाजपाच्या धार्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले, महंत रमेशगिरी महाराज, ओम गुरुदेव जंगलीदास आश्रमाचे परमानंद महाराज, गिरीजानंदन, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजिवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, लक्ष्मीमाता दूधचे बाबासाहेब चिडे, अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्हाडे, संदिप पारख, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे, विठ्ठलराव लंघे, डॉ. राजेंद्र पिपाडा, सिध्दार्थ मुरकूटे, ममता पिपाडा, वंदना मुरकूटे, कमलाकर कोते, कडूभाउ काळे, केशवराव भवर, बाळासाहेब वक्ते, मच्छिंद्र टेके, अनुसया होन, वैजापूरचे माजी नगराध्यक्ष साबेरभाई खान, सप्ताहाचे अध्यक्ष सुधाकर रोहोम, कार्याध्यक्ष संभजी रक्ताटे, सचिव शरद थोरात, रंगनाथ लोढे, सचिन जगताप, दत्तु खपके, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, बाळासाहेब रंजाळे महाराज, भगवान डमाळे महाराज, नवनाथ महाराज आंधळे, चंद्रकांत महाराज सावंत, गणेश महाराज शास्त्री, मधुसूदन महाराज, भाउसाहेब महाराज, प्रा. सुनिल गमे, यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह लाखो भाविक उपस्थित होते.
काल्याच्या किर्तनासाठी महंत रामगिरी महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांची कृष्णे वेधियेली विरहीणी बोले। चंद्रमा करितो उबा राहे माये॥ ही गौळण निरुपणासाठी घेत महाराजांनी श्रीकृष्णाचे गोकुळवासियांचे प्रेम, त्यांची भक्ती, श्रीकृष्णाच्या रुपाचे वर्णन महाराजांनी करत गायनातुन अवघा भाविक ही थिरकविला. अनुराग, मिलनानुराग आणि विरहानुराग यांचे स्पष्टीकरणही केले. ते म्हणाले, पुर्वनुरागात भगवंत दर्शनाची तीव्र इच्छा असते, पण ती पुर्ण होत नाही. मिलनानुरागात दर्शनाची तीव्र इच्छा असते. असे सांगत महाराज म्हणाले, भक्त आणि भगवंत प्रेम जिवाशी असते. प्रेम विरक्त असेल तर भगवंत प्रकट होतात. विरहानुरागात परमेश्वराच्या विरहाचे वर्णन आहे. भगवंत भेटीसाठी गोपिका व्याकुळ झाल्या होत्या.
⬜◼️दान केल्याने धनाची शुध्दी होते - महंत रामगिरी महाराज..
काल्याच्या किर्तनात श्रीकृष्णाचे वर्णन करतांना महाराज म्हणाले, जो चित्ताचे आकर्षण करतो, तो कृष्ण. भक्ताच्या चित्ताला कृष्ण आकर्षीत करतो. जगातले सर्व सुंदर पदार्थ भगवंतापुढे फिके आहेत. भगवंताच्या वेणुचे स्वराचा आवाजाचा संपुर्ण ब्रम्हांडावर परिणाम होतो. असे वर्णन करत महाराजांनी गोपिकांच्या मनाची स्थिती भाविकांपुढे मांडली. श्रीकृष्णाच्या लिलांच्या बाबत गैरसमज असले तरी भगवंताच्या त्या लिला आहेत. भगवंत ही चिरहरण लिला करतात. मग रासलिला करतात. भगवंताने चोरी केली नाही, ती भगवंताची चौर्य लिला होती. ती प्रेमासाठी होती. प्रेमाच्या भांडणात जसा आनंद आहे. तसा प्रेमाच्या चोरीतही आहे. असे सांगत नवरा बायकोच्या प्रेमाच्या भांडणाचा प्रसंग सांगत महाराजांनी उपदेशही केला. गोपी भगवंतासाठी रडत होत्या. त्यावर महाराज म्हणाले, भगवंता करता रडतो, त्याचे गित होते. गोपी रडल्या, संसार रडवितो.
ज्या सेवेत स्वार्थ नाही, ती सेवा भगवंताची पूजा
या सप्ताहाला भक्तीचा महापूर लोटला आहे. हे पाहुन पांडूरंग पढरीत नाही. ते येथे आलेत, परमात्म्याला पाहाण्यासाठी दिव्य चक्षु पाहिजे. पांडूरंग म्हणतात जेथे भक्त जातात तेथे मी आहे. हे सदगुरु योगिराज गंगागिरी महाराजांच्या तपस्येचे फळ आहे. या सप्ताहात सात दिवस भगवंत चिंतन केले. काही काळ धो धो पाऊस आणि कडक उन असतानाही भाविकांची भक्ती टिकून आहे. याप्रसंगी अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले, आमदार अशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे भाषणे झाली.
महंत रामगिरी महाराज..
संतांच्या दृष्टीत अमृत तर दुर्जनाच्या दृष्टीत विष असते
या सप्ताहात 400 पोति साखरेची बुंदी तयार करण्यात आली होती. तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कापसे पैठणीच्या वतीने बाळासाहेब कापसे यांनी 600 पोती चिवडा देण्यात आला होता. या सर्व महाप्रसादाचे वाटप 300 ट्रॅक्टरद्वारे करण्यात आले. यासाठी 10 हजार वाढपी भाविकांच्या दिमतीला होते. सर्वांना प्रसाद मिळाला. पण पावसाने हजेरी लावल्याने सप्ताह स्थळ सोडतांना अनेकांना भीजावे लागले.
⬜◼️आळंदी आश्रमासाठी कोल्हेंची मदत ⬜◼️
सराला बेटाच्या आळंदी येथील मठास माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजिवनीचे विवेक कोल्हे यांनी 11 लाख रुपयांचा धनादेश महंत रामगिरी महाराजांकडे सोपविण्यात आला. दिवंगत माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या स्मरणार्थ तो देण्यात आला. आमदार आशुतोष काळे यांनीही या सप्ताहासाठी भरीव मदत केली. रस्ते, रोहित्र तसेच साखर, व निधी दिला.
याप्रसंगी उषाताई दुशिंग, महेश लोंढे, विजय रक्ताटे, वसंत लोंढे, नंदकिशोर पवार, विजय थोरात, सुभाष जाधव, शिवाजी लोहकणे, जालिंदर हाडोळे, विकास रोहोम, उत्तमराव तुळशीराम रक्ताटे, मधुकर रोहोम, प्रभाकर रक्ताटे, दिपक रोहोम, शामराव शिरोळे, नवनाथ मेहेत्रे, दादासाहेब रंजाळे, भगवान महाराज डमाळे, सुभाषराव गमे, सुरेशराव गमे, विठ्ठलदास असावा, मच्छिंद्र चोळके, यांचेसह भाविक लाखोंच्या संख्यने उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

