प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज तालुक्याच्या सत्तरच्या दशकातील राजकारण व समाजकारणावर प्रचंड दबदबा असणारे एक नांव म्हणजे बाबुरावजी आडसकर ... !
केज पंचायत समितीचे सभापती, 1972 ते 77 पर्यंत विधान सभेचे आमदार व नंतर सलग बारा वर्ष बीड,लातुर व उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार हा त्यांचा प्रवास होता. हाबाडा हा त्यांचा शब्द संपुर्ण महाराष्ट्रात आजही चर्चिला जातो.माजी आमदार स्व. बाबुरावजी आडसकर साहेब यांचे 12/8/2016 रोजी दुःखद निधन झाले होते.
दि.12/8/2022 रोजी स्व.बाबुरावजी आडसकर साहेब (तात्या) यांचे सहावे पुण्यस्मरण होणार असुन त्या निमित्त आडस येथील शिवसाई मंगल कार्यालय,शिवाजी चौक आडस येथे ह.भ.प.महादेव महाराज बोराडे (शास्ञी) यांचे किर्तन होणार आहे.या किर्तनानंतर भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. या प्रसंगी राजकीय व सामाजिक क्षेञातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी केज,अंबाजोगाई , वडवणी, माजलगांव तालुक्यातील सर्वांनी उपस्थित राहुन उपकृत करावे असे आवाहन भाजपा नेते रमेशराव आडसकर यांनी केले आहे.

