shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सर्वधर्म् समभावाने सर्वांनी एकमेकास सहाय्य करून एकोप्याचा संदेश दिला पाहिजे - आमदार दत्तात्रय भरणे.

सर्वधर्म् समभावाने सर्वांनी एकमेकास सहाय्य करून एकोप्याचा संदेश दिला पाहिजे - आमदार दत्तात्रय भरणे.
इंदापूर प्रतिनिधी: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त क्रीडा विकास अनुदान क्रीडा साहित्य लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ३ लाख रुपये किमतीचे इंदापूर शहर येथील सरस्वती नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यास करण्यात आले.
 यावेळी सर्वप्रथम आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अमृत महोत्सवी ध्वजारोहण करण्यात आले.
 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शहर अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, धनंजय बाब्रस ,विठ्ठल ननवरे,श्रीधर बाब्रस,इंद्रजित धुमाळ,डॉ राजेश जाधव,ऍडव्होकेट आशुतोष भोसले,सौरभ शिंदे,दादा सोनवणे,सुनील अरगडे,डॉ रियाज पठाण,मुख्याध्यापिका भालेराव मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती चे संदीप भन्डलकर , निसार शेख  आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की,प्रथम सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या  शुभेच्छा दिल्या तसेच स्वातंत्र संग्रामात् ज्यांनी बलिदान दिले त्यांना अभिवादन केले तसेच सर्वधर्म् समभावाने सर्वांनी एकमेकास सहाय्य करून एकोप्याचा संदेश दिला पाहिजे .
close