हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.५,केंद्रातील भाजप सरकारने चालवलेल्या हुकुमशाहीमुळे देशभरात महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे,दुग्धजन्य पदार्थावर जिएसटीचा भार लावल्याने याचा निषेध करीत दि.५ आँगस्ट शुक्रवार रोजी काँग्रेसच्या वतीने उप जिल्हाध्यक्ष माजी जि.प.सदस्य ओमप्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगांव तहसिलवर मोर्चा काढण्यात आला असून तहसिलदार जिवककुमार कांबळे यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती मोहदय यांना निवेदन देण्यात आले आहे.
केंद्रातील भाजप सरकारने चालवलेल्या हुकुमशाहीमुळे देशभरात महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे,दुग्धजन्य पदार्थावर जिएसटीचा भार लावल्यामुळे सर्वसामान्यांचे जगने मुश्किल झाले आहे.शेती उपयोगी रासायनिक खतांची सबसिडी कमी केल्यामुळे खताचे भाव प्रचंड प्रमाणात वाढले आहेत.हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यावर सुलतानी,आसमानी संकटे ओढवलेली आहेत.जिल्हयामध्ये पुर व अतिवृष्टीमुळे शेतकरी नैराश्याच्या गर्देत ढकलला गेला आहे तरी ही जनतेची हित जोपासले जात नसुन केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे देशात महागाई डिझेल,पेट्रोल आणि गँसच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.तसेच अग्निपथ योजनेमुळे युवकांचे भविष्य अंधारमय झालेले आहे.तरी महागाई कमी करुन सामान्य जनतेची होरपळ थांबावी या मागणीचे निवेदन तहसिलदार साहेब यांच्या मार्फत देशाचे महामहीम राष्ट्रपती मोहदयांना देण्यात आले आहे.यावेळी काँग्रेसचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष माजी जि.प.सदस्य ओमप्रकाश देशमुख,तालुकाध्यक्ष विनायकराव देशमुख,सचिन मस्के,अनिरुद्ध कदम आदीसह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


