प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : २६ / जैन समाजाचा चातुर्मास पर्व सुरू होत आहे . या पर्वात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते .
महावीर जन्म कल्याणक प्रमाणे या वेळेस ही जैन उत्सव चातुर्मास निमित्ताने वर्धमान युवा परिवाराने भव्य सजावट स्पधेचे आयोजन केले आहे. सजावटीसाठी जैन उत्सव,जैन तत्व, जैन तीर्थ असे विषय ठरविले आहेत. सर्व जैन बंधु भगिनींना स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे .
स्पर्धे साठी इच्छुक असणाऱ्यांनी आपले नाव, पत्ता, सजावटीचे विषय आणि मोबाईल नंबर या पद्धतीने अशा फॉरमॅट मध्ये ७७७४९२६३६० या क्रमांकावर व्हाट्सअँप करावे असे वर्धमान युवा परिवारा मार्फत आवाहन करण्यात आले आहे .

