shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापुर भाजपचे युवा नेते किरण काळे यांनी ऊसतोड मजूर कुटुंबियांसोबत साजरा केला रक्षाबंधन सन*

*इंदापुर भाजपचे युवा नेते किरण काळे यांनी ऊसतोड मजूर कुटुंबियांसोबत साजरा केला रक्षाबंधन सन* 
इंदापूर प्रतिनिधी:इंदापुर तालुका भाजपचे युवा नेते मा.किरण-भाऊ बाळासो काळे यांनी काल गुरुवार दि.11 ऑगस्ट 2022 रोजी इंदापुर तालुक्यातील कळस येथील असंघटीत ऊसतोड मजुरांच्या वस्तीला भेट दिली. त्यावेळेस सर्व ऊसतोड मजूर महिलांनी रक्षाबंधन सनाच्या निमित्ताने त्यांचे औक्षण करून स्वागत केले आणि त्यांना राखी बांधली. 
यावेळी किरण काळे यांनी राखी पोर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित सर्व ऊसतोड मजूर महिलांना पेढे, खण, नारळ, ओटीचे साहित्य देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत रक्षाबंधन सन साजरा केला.
close