shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बुधभूषण फाउंडेशन तर्फे तिरंगा ध्वज चे मोफत वाटप


प्रतिनिधी : सुर्यकांत होनप

 करमाळा : १३ /   ७५ व्या स्वातंत्र दिनानिमित्त आजादी का अमृतमहोत्सव अभियान अंतर्गत हर घर तिरंगा चे मोफत वाटप बुधभूषण फाउंडेशन चे व्हा . चेअरमन दुर्गेश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. सदरचा उपक्रम करमाळा शहरात राबविण्यात आला आहे.

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत आज संपूर्ण देशात प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आदेश प्रशासनाने शहर तसेच ग्रामीण भागातील प्रशासनाला दिले आहेत त्या दृष्टिकोनातून हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्याचे काम सुरू आहे तसेच हर घर तिरंगा या राष्ट्रीय मोहिमे कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय ध्वजाचा अवमान न करता प्रत्येक भारतीयांनी तिरंगा ध्वजाचा सन्मान करावा व सर्वसामान्य नागरिकांना महत्व पटवून द्यावे असे आवाहन सामाजिक संघटना बुधभूषण फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले .

 हा उपक्रम दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. करमाळा शहरातील तसेच तालुक्यातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन फाउंडेशन चे चेअरमन अमोल दुरंदे यांनी केले.

यावेळी बाळासाहेब आव्हाड,आलिंम शेख,राहुल लांडगे,सागर महामुनी,भानुदास बिटके,आतिष दोशी,संदीप चुंग ,संजय कट्टा आदि उपस्थित होते.
close